Skin care : त्वचा झटपट चमकदार आणि ग्लोईंग करण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा

त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या.

Skin care : त्वचा झटपट चमकदार आणि ग्लोईंग करण्यासाठी 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा
हेल्दी आणि सुंदर त्वचा

मुंबई : त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली पाहिजे असेल तर चला, त्वचा सुधारण्यासाठीच्या या टिप्स जाणून घेऊया. विशेष म्हणजे या टिप्स फाॅलो केल्यातर आपली त्वचा कायमसाठी चांगली होते. (To brighten the skin Try this face pack)

-अर्धी केळी, अर्ध लिंबू घ्या, प्रथम केळी मॅश करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये लिंबू पिळून घ्या. तयार मिश्रणाने त्वचेची मालिश 5 ते 7 मिनिटे आणि नंतर 15 मिनिटांवर ठेवा. त्यानंतर ते ताज्या पाण्याने चेहरा धुवा. आपण दररोज हे करू शकता.

-आवळा, लिंबू आणि मध यांचा फेसपॅक चेह-याला थंडावा मिळतो. या लेपामुळे चेह-यावरील पुटकुळ्या कमी होतात. हा लेप तयार करण्यासाठी 2 चमचे आवळ्याचा रस, 2 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि त्यात आणखी २ चमचे आवळा पावडर एकत्र करुन हा लेप चेह-यावर लावा त्यानंतर 20 मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.

-पपई आणि आवळ्याचा फेसपॅक, पपईच्या गरामुळे चेहरा उजळतो. तसेच चेह-यावरील मृत त्वचा निघून जाण्यासही मदत होते. यासाठी 2 चमचे आवळा पावडर आणि पपईचे बारीक तुकडे एकत्र करुन हा मास्क 15 मिनीटे चेह-यावर लावा त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

-लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा असतो. यामुळे नियमित मर्यादित स्वरुपात लिंबू पाणीचे सेवन केल्यास त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे सुरकुत्या, पिगमेंटेशन, मुरुम इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.

-जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावी. मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा. त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा देखील तजेलदार होते. जर आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होईल.

-आपण तिळाच्या तेलानी रोज मालिश करायला पाहिजे. चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ करण्यासाठी तिळाच्या तेलाची मदत होते. या तेलामुळे चेहऱ्यावरील डाग देखील निघून जातात. दररोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाने मालिश करावी आणि सकाळी पाण्याने धुवावे.

(टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(To brighten the skin Try this face pack)