शिष्यवृत्ती मिळाल्यावर कमी पैशात पुर्ण भारत देश फिरवेल ‘ही’ ट्रेन, जाणून घ्या ट्रेनने कसा प्रवास करू शकता
लांबचा प्रवास करायचा असेल तर बसऐवजी ट्रेनने प्रवास करणे सर्वोत्तम मानले जाते. जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा ट्रेनबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला भारतभर घेऊन जाईल, परंतु त्यासाठी काय नियम आहेत आणि तुम्ही या ट्रेनने कसा प्रवास करू शकता ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात...

बहुतेक लोकांना प्रवास करायला खूप आवडते, तर काही जण असे ही आहेत ज्यांना संपूर्ण जग फिरायचे असते आणि भटकंती करायची असते. कारण जगभर प्रवास करण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत. अशातच आपण आपल्या भारत देशातील अशी काही ठिकाण आहेत जी एक्सप्लोर करण्यासारखी आहेत. त्यात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आपला देश हा नैसर्गिक सौंदर्याने तसेच ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण आहे, परंतु हे सर्व ठिकाण फिरायला जाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बजेट. तुम्ही एखाद्या ठिकाणी कितीही जवळ गेलात तरी किमान 5 ते 10 हजार रुपये लागतात, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा ट्रेनबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला अगदी कमी पैशात संपूर्ण भारतभर प्रवास करून देते. खरं तर, यामध्ये एक निवड प्रक्रिया आहे, ज्याद्वारे लोकांची निवड केली जाते आणि तुम्हाला शिष्यवृत्तीच्या आधारे पैसे खर्च करावे लागतात, जेणेकरून तुम्ही कमी बजेटमध्ये तुमचा 15 दिवसांचा भारत प्रवास पूर्ण करू शकाल. तर या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टी आधीच माहित असणे महत्वाचे आहे.
आपला भारत देश समुद्रापासून ते डोंगरभागांपर्यंत इतकी सुंदर ठिकाणं आहे की जर तुम्ही या ठिकाणांच्या सौंदर्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तर ट्रिप प्लॅनिंगबद्दल बोलायचे झाले तर, असे बरेच लोक आहेत जे ऐतिहासिक आणि कलापूर्ण ठिकाणांना भेट देऊ इच्छितात, तर काहींना ॲडव्हेंचर आवडते, परंतु आपल्याकडे अनेकजण हे निसर्गप्रेमी आहेत जे फक्त सुट्टी घेऊन निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवतात. तुम्हाला ही या निसर्गाचे अद्भूत सौंदर्यांचा आंनद घ्यायचा असेल तर आपल्या कडे अशी एक ट्रेन आहे जी शिष्यवृत्तीच्या आधारे कमी बजेटमध्ये आपल्या देशातील अनेक ठिकाणे एक्सप्लोर करू शकतात. तर तुम्ही या ट्रेनने कसे प्रवास करू शकता ते आपण जाणून घेऊयात…
ट्रेनचे नाव काय आहे?
संपूर्ण भारताचा दौरा करणाऱ्या ट्रेनला ‘जागृती यात्रा’ म्हणतात. या ट्रेनच्या नावावरूनच कळते की… ही ट्रेन एका खास उद्देशाने चालवली जाते. या ट्रेनमधून प्रवास करण्यामागील उद्देश उद्योगाद्वारे भारताची उभारणी करणे आहे. लोकांना त्या भारताची ओळख करून देणे जे मोठमोठ्या शहरी जीवनापैक्षा खूप वेगळे आहे.
15 दिवसांचा प्रवास
जागृती यात्रा ट्रेनचा प्रवास 8 हजार किलोमीटरचा असतो आणि तुमचा प्रवास 15 दिवसांचा असतो. ही ट्रेन 2008 मध्ये सुरू झाली होती. तसेच ही ट्रेन जागृती सेवा संस्थान संस्थेद्वारे चालवली जाते. अशातच या ट्रेनसाठी 525 प्रवाशांची निवड केली जाते, ज्यासाठी अर्ज करावा लागतो.
निश्चित वयोमर्यादा
या ट्रेनचा उद्देश तरुणांना उद्योगांबद्दल माहिती देणे, त्यांना चांगली समज देणे, भारतातील लहान शहरे आणि खेड्यांशी त्यांची ओळख करून देणे आणि एक चांगले नेटवर्क प्रदान करणे आहे. म्हणूनच या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 21 वर्षांवरील मुल यासाठी अर्ज करू शकतात. या प्रवासादरम्यान, तरुणांना तज्ञांकडून उद्योजकतेच्या बारकाव्यांबद्दल माहिती दिली जाते.
ट्रेन कधी धावते, नोंदणी कशी करावी
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ट्रेनने प्रवास कधी करावा तसेच ही ट्रेन कधी सुरू होते, तर आम्ही तुम्हाला सांगतो की जागृती यात्रा ट्रेन वर्षातून एकदा धावते. तुम्ही ‘jagritiyatra.com’ ला भेट देऊन 2025 साठी नोंदणी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले जाते. तुम्ही त्यांच्या नंबरद्वारे साइटशी देखील कनेक्ट होऊ शकता. प्रवासात होणारा खर्च संस्थेकडून दिला जातो. ही ट्रेन नोव्हेंबर महिन्यात 15 दिवसांचा प्रवास करते.
