AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं AI वापरून करा प्लॅनिंग आणि अनुभवा बेस्ट ट्रिप

मे महिना सुरू होईल आणि मुलांच्या शाळा लवकरच बंद होतील. मग घराघरातून फिरायला जाण्याची लगबग सुरू होईल. समुद्रकिनाऱ्यांवर भटकायचं, थंड ठिकाणी सुट्टी घालवायची असं काही ना काही प्लॅन ठरतं. पण प्रवास ठरवणं, तिकीटं काढणं, बजेट बनवणं यामुळे डोक्याला ताप होतो. मात्र आता या सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत, कारण तुमचा 'AI ट्रॅव्हल एजंट' मदतीला सज्ज आहे!

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं AI वापरून करा प्लॅनिंग आणि अनुभवा बेस्ट ट्रिप
Vacation Planning
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: May 02, 2025 | 11:38 PM
Share

आता ChatGPT, Microsoft Copilot आणि इतर AI टूल्स फक्त प्रश्नांची उत्तरं देणारे चॅटबॉट राहिले नाहीत, तर ते तुमचं वैयक्तिक ट्रॅव्हल प्लॅनरही बनू शकतात. तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात, कधी जाणार आहात, किती दिवस राहणार आहात यावर आधारित AI तुम्हाला योग्य पॅकिंग लिस्ट, ट्रिपचा संपूर्ण आराखडा आणि बजेटमध्ये बसणारे सर्वोत्तम पर्याय सुचवू शकतो.

पॅकिंगपासून तिकीट बुकिंगपर्यंत AI करेल संपूर्ण मदत

फिरायला जाताना काय घ्यावं, किती कपडे घ्यावेत, हवामानानुसार काय गरजेचं आहे, यासाठी तुम्ही AI ला विचारू शकता. तसंच, स्वस्त विमान किंवा ट्रेनचं तिकीट कुठे मिळेल, कोणता प्रवासाचा मार्ग योग्य आहे, याचाही सल्ला AI देतो. तुम्ही एखादं वाक्य टाकलं की AI तुमच्यासाठी एकदम व्यवस्थित योजना तयार करतो.

प्रवासादरम्यान रिअल टाइम माहिती मिळवा

प्रवास चालू असताना ट्रेनचं लाईव्ह स्टेटस, फ्लाईटची अपडेट्स, PNR स्टेटस जाणून घ्यायचं असेल, तर AI तिथेही मदत करतो. वेळ वाचतो आणि विविध अ‍ॅप्स उघडून माहिती शोधायचा त्रास टळतो. ट्रेन रद्द झाली किंवा फ्लाईट लेट झाली, तर AI लगेच पर्यायी मार्गही सुचवतो.

छोट्या टिप्सपासून मोठ्या योजना बनवतो AI

प्रवासात सोबत ठेवायच्या औषधांची यादी, लहान मुलांसाठी विशेष तयारी, गर्दी कशी टाळायची यासारख्या लहान पण महत्त्वाच्या गोष्टींचाही AI चांगला सल्ला देतो. त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुटसुटीत आणि आनंददायी होतो.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू