गुडघे आणि कोपरावरील काळपटपणामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करा !

आपला चेहरा आणि केस सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक उपाय किंवा घरगुती उपाय करत असतो.

गुडघे आणि कोपरावरील काळपटपणामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करा !
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 7:46 AM

मुंबई : आपला चेहरा आणि केस सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक उपाय किंवा घरगुती उपाय करत असतो. मात्र, या तुलनेने हाता-पायांच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्वचा रुक्ष होणं, पायांच्या टाचांना भेगा पडणे, गुडघे काळे होणे यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी गुडघ्यांचा आणि कोपऱ्याचा काळपटपणा कसा दूर करायचा हे सांगणार आहोत. चला तर मग बघूयात (Try home remedies to remove blackheads on the knees and elbows)

-कोरफड जेल त्वचेच्या अनेक समस्यांवर फायद्याचं ठरते. काळपटपणा दूर करण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक चम्मच कोरफड जेल मिसळा. त्यानंतर याला मानेवर, कोपरावर, गुडघ्यावर लावा. कापसाच्या मदतीने तुम्ही हे लावू शकता. 20 मिनटांनंतर कामट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

-खोबरेल तेल शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तसंच गुडघ्यांचा काळपटपणा दूर करायचा असेल तर खोबरेल तेल थेट लावण्यापेक्षा त्यात अक्रोडची पावडर मिक्स करावी आणि त्वचेवर लावा साधारण 25 ते 30 मिनिटे हे कोपरावर आणि गुडघ्यांवर लावून ठेवा असे आठवड्यातून तीन वेळा करा यामुळे तुमच्या कोपरावरील काळपट पणा निघून जाईल

– टोमॅटो मिक्सरमधून बारिक पेस्च करुन घ्या. कोपर आणि मानेवर लावा. 20 मिनटांनंतर धुवून घ्या. एका आठवड्यात तीनवेळा हे केल्याने काळपटपणा दूर होईल. लिंबूमध्ये साखर मिसळा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे काळपटपणा कमी होतो. साखरेच्या जागी मधाचाही वापर करु शकता.

-लिंबाचा रस हा अत्यंत आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. लिंबाचा रस गुडघ्यांवर लावा आणि जवळपास 1 तास तो तसाच ठेवा. एक तास झाल्यानंतर पाय स्वच्छ धुवून टाका. दररोज हा उपाय केल्यास गुडघ्यांचा काळपटपणा दूर होईल.

-दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करुन हे मिश्रण गुडघ्यांवर लावावं. त्यानंतर थोडावेळ त्याने स्क्रब करावं. पाच मिनिटे ही पेस्ट अशीच गुडघ्यांवर ठेवून नंतर धुवून टाकावी. यामुळे तुमच्या कोपऱ्यावरील आणि गुडघ्यांवरील काळपट पणामुळे दूर होतो.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

(Try home remedies to remove blackheads on the knees and elbows)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.