AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअपची कशी काळजी घ्याल ? या ट्रिक्स पडतील उपयोगी

पावसाळ्याच्या दिवसात मेकअप कडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. आर्द्रतेमुळे मेकअप लवकर उतरू शकतो. त्यामुळे चेहऱ्यावर मेकअप करताना काही गोष्टी नीट लक्षात ठेवाव्यात. त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आपण जाणून घेऊया.

Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअपची कशी काळजी घ्याल ? या ट्रिक्स पडतील उपयोगी
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 21, 2023 | 9:23 PM
Share

Rain Proof Makeup Tips : पावसाळ्यात बरेचसे जण जास्त मेकअप (makeup tips) करण्यास प्राधान्य देत नाहीत कारण हवेतील ओलावा, आर्द्रतेमुळे तुमचा लूक पटकन खराब होऊ शकतो. पावसाळ्यात (monsoon) मेकअप नीट केला नाही तर तुमचा लूक बिघडू शकतो. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात मेकअप कडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. आज आपण या लेखाच्या माध्यमातून पावसाळ्यातील काही खास मेकअप टिप्स (makeup tips) जाणून घेऊया, ज्यामुळे तुमचा लूक खराब होणार नाही. आणि मेकअपही नीट टिकून राहील.

क्रीम बेस प्रॉडक्ट्स

जर तुम्ही क्रीम बेस असलेल्या उत्पादनांचा वापर करत असाल तर पावसाळ्याच्या दिवसांत त्यांचा आवर्जून कमी वापर करावा. या काळात जास्त ह्युमिडिटी असते, त्यामुळे क्रीम बेस असलेली उत्पादने नीट ब्लेंड करून मगच त्यांचा वापर करावा. तसेच क्रीम बेस्ड उत्पादने ही पावडर बेस्ड उत्पादनांसोबत मिसळून वापरण्याचीही काळजी घ्या. यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकून राहील.

सेटिंग पावडरचा वापर करा

पावसाळ्यात आपला मेकअप जास्त टिकावा यासाठी सेटिंग पावडरचा वापर करा. एक चांगली सेटिंग पावडर वापरून तुमचा मेकअप सेट करा. यामुळे मेकअप जासत काळ टिकून राहतो. सेटिंग पावडर लावण्यासाठी मोठ्या ब्रशचा वापर करावा.

बोल्ड लिप कलर्स वापरावेत

लिपस्टीकबद्दल अनेक महिला एक्सपेरिमेंट्स करत असतात. मान्सून सीझनमध्ये बोल्ड लिप कलर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमचा मेकअपही खूप उठून दिसेल. आजकाल बाजारात अनेक वॉटर प्रूफ लिपस्टीक्स आल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अशा लिप शेड्सचा वापर करता येऊ शकतो.

हायजीनचीही घ्या काळजी

मात्र पावसाळ्याच्या दिवसात जास्त हेवी मेकअप करणे टाळावे. तसेच तुमच्या त्वचेचीही या ऋतूमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तुमचे हात नेहमी स्वच्छ धुवावेत. चेहराही क्लिंजरने नीट स्वच्छ करावा. या ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो. त्यामुळे त्वचेला संसर्ग होण्याचीही शक्यता अधिर असते. त्यामुळे हेवी मेकअप करणे टाळा. तसेच चेहऱ्यावर जास्त फाऊंडेशनचाही वापर करू नका.

मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.