थंडीत भेगा पडलेल्या टाचांमुळे झालात त्रस्त ? रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम, भेगा होतील गायब

थंडीच्या दिवसांत पायांन भेगा पडण्याचा बहुतांश व्यक्तींना होतो. मात्र त्याची योग्य काळजी घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

थंडीत भेगा पडलेल्या टाचांमुळे झालात त्रस्त ? रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम, भेगा होतील गायब
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 12:48 PM

नवी दिल्ली – हिवाळ्याचा ऋतू (winter season) अनेक समस्या घेऊन येतो आणि त्यातील बहुतांश समस्या आपल्या त्वचेशी संबंधित असतात. महिला असो की पुरुष, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची (dry skin) तक्रार प्रत्येकालाच असते. टाचांना भेगा पडणे (cracked heels) हे देखील ही कोरड्या त्वचेशी संबंधित समस्या आहे. हिवाळ्यात त्याचा जास्त त्रास होतो. थंड व कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी पडते, तसेच पायाची त्वचाही कोरडी झाल्याने भेगा पडतात.

हा त्रास कधीकधी इतका वाढतो, की पाय जमिनीवर टेकवणही कठीण होतं. तु्म्हालाही असा त्रास होत असेल तर काही उपायांनी ही समस्या दूर करता येऊ शकते. पण मुळात थंडीत भेगा का पडतात हे जाणून घेऊया

थंडीत टाचांना भेगा का पडतात ?

हे सुद्धा वाचा

टाचांना भेगा पडण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु हिवाळ्यात वाहणारे थंड कोरडे वारे हे याचे सर्वात मोठे कारण आहे. वास्तविक, थंडीच्या दिवसात गार वारा किंवा थंड हवा ही त्वचेपर्यंत खोलवर पोहोचते आणि त्यामुळे ओलावा कमी होतो. हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते, त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

या गोष्टींची घ्या काळजी

हिवाळ्यात तुमच्या पायाच्या टाचांना वारंवार भेगा पडत असतील तर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही ही समस्या टाळू शकता.

1) पाय 20 मिनिटं गरम पाण्यात भिजवा

जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात 20 मिनिटे पाय भिजवा. त्यानंतर प्युमिक स्टोनने पायवरील अतिरिक्त चरबी काढून टाका. असे केल्याने पायांना ओलावा मिळतो आणि भेगा पडणे कमी होते.

2) ऑईलबेस्ड पेट्रोलिअम जेलीचा वापर करा

पाय पाण्यातून काढल्यानंतर, ते सुती कापड किंवा टॉवेलने सुमारे 10 मिनिटे गुंडाळून ठेवा. नंतर ते नीट पुसून कोरडे करा व त्यावर ऑईल बेस्ड पेट्रोलिअम जेली लावा. असे केल्याने, पायांच्या भेगा हळूहळू भरतील.

3) रात्री झोपताना मोजे घाला

जर तुमच्या टाचांना भेग पडली असेल तर शक्य तितका वेळ ओलसर ठेवणे महत्त्वाचे आहे. पेट्रोलिअम जेली लावल्यानंतर पायात मोजे घाला, रात्री झोपताना कमीतकमी 2 ते 3 तास मोजे घाला ज्यामुळे भेगा बऱ्या होण्यास मदत होईल.

4) अनवाणी पाय जमिनीवर ठेऊ नका.

चुकूनही पाय थंड जमिनीवर ठेवू नका. तसेच, जर तुमच्याडल्या असतील तर अनवाणी पाय जमिनीवर ठेवू नका, कारण असे केल्याने भेगांमध्ये संसर्ग होऊ शकतो. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी पाय जमिनीवर ठेवू नका. पायात मोजे किंवा चपला घालाव्यात.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.