Homemade Hair Spa cream : अवघ्या 20 रुपयांत घरच्या घरी तयार करा हेअर स्पा क्रीम, मिळतील अद्भुत फायदे

घरच्या घरी काळजी घेऊनही केस निरोगी आणि चमकदार बनवता येतात. अवघ्या 20 रुपयांमध्ये तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा क्रीम तयार करू शकता. त्याचे फायदे जाणून घ्या...

Homemade Hair Spa cream : अवघ्या 20 रुपयांत घरच्या घरी तयार करा हेअर स्पा क्रीम, मिळतील अद्भुत फायदे
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 11:42 AM

नवी दिल्ली – धूळ किंवा प्रदूषणामुळे तसेच विस्कळीत जीवनशैली आणि इतर कारणांमुळे आपले केस कोरडे (dry hair) आणि निर्जीव दिसतात. केस गळणे, पातळ होणे, कोंडा होणे आणि त्यांचे निस्तेज व कोरडे दिसणे ही समस्या आजकाल खूप सामान्य आहे. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास केस झपाट्याने गळू (hair fall) लागतात आणि टक्कलही पडू शकते. केसांची निगा राखण्यासाठी हेअर स्पा (hair spa) ही सर्वोत्तम पद्धत आहे, परंतु त्याची किंमत जास्त असल्याने प्रत्येकाला ते परवडतच असे नाही.

घरच्या घरी काळजी घेऊनही केस निरोगी आणि चमकदार बनवता येतात. अवघ्या 20 रुपयांमध्ये तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा क्रीम तयार करू शकता. त्याचे फायदे जाणून घ्या…

हेअर स्पा बनवण्यासाठी साहित्य –

हे सुद्धा वाचा

खोबरेल ते – 3 चमचे

शिया बटर – 2 चमचे

अंडी

मध – 3 चमचे

असे बनवा हेअर स्पा क्रीम –

सर्व प्रथम, एका बाऊलमध्ये शिया बटर, मध आणि अंडी घाला आणि चांगले मिसळा. मिश्रण तयार झाल्यावर त्यात खोबरेल तेल टाकून पुन्हा सर्व चांगले मिसळा. हेअर स्पा क्रीम काही मिनिटांत तयार होईल.

असे लावा घरी तयार केलेले हेअर स्पा क्रीम

हे क्रीम केसांना लावण्यापूर्वी कंगवा्याने केस नीट विंचरून घ्या, जटा काढून टाका. नंतर केस ओले करा व नाट वाळवा. नंतर ब्रशच्या सहाय्याने केसांना क्रीम लावा. स्कॅल्प आणि केस दोन्हींना नीट क्रीम लावा. हे क्रीम वाळल्यानंतर केसांना थोडा वेळ वाफ द्या. व थोड्या वेळाने सौम्य शांपू, कंडीशनर वापरून केस स्वच्छ धुवून टाका.

हेअर स्पा क्रीमचे फायदे

होममेड हेअर स्पा क्रीम केसांना पुनरुज्जीवित करते आणि चमक वाढवते. यासोबतच केसांना चांगले पोषणही मिळते. कोंड्याची समस्याही या क्रीमने दूर होऊ शकते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.