केसगळती रोखण्यासाठी या गोष्टी टाळा, अन या गोष्टी आवर्जून करा.. जाणून घ्या Do’s and Don’ts

केसगळती थांबवायची असेल किंवा सुंदर आणि दाट केस मिळवायचे असतील तर काही गोष्टींचा अवलंब करायला हवा. काही चुका केल्याने केस जास्त गळतात.

केसगळती रोखण्यासाठी या गोष्टी टाळा, अन या गोष्टी आवर्जून करा.. जाणून घ्या Do's and Don'ts
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 2:23 PM

नवी दिल्ली – चांगले, सुंदर आणि घनदाट केसांमुळे प्रत्येक महिलांचा आत्मविश्वास वाढवतो. केसगळती (hair fall) सुरू झाली किंवा केस पातळ झाले तर प्रत्येकाला चिंता वाटते. आपल्यापैकी अनेक स्त्रिया दर 15-20 दिवसांनी हेअर स्पा (hair spa) घेतात, आपले केस नेहमीच सुंदर आणि चांगले दिसण्यासाठी महागडी उत्पादने वापरतात. पण अशा अनेक घरगुती वस्तू (home remedies) आहेत ज्यांचा वापर तुम्ही केस गळणे थांबवण्यासाठी किंवा केसांच्या वाढीसाठी करू शकता.

अनेक तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, केस गळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. केस गळण्याचे एक चक्र असते ज्यामध्ये आपले केस काही टप्प्यांतून जातात. यामध्ये केस गळतात आणि कालांतराने नवीन केस तयार होतात. पण केस गळणे थांबली नाही तर किंवा रोज 100 पेक्षा जास्त केस गळू लागले ते त्रासदायक ठरू शकते. केसगळतीचा त्रास वाढू द्यायचा नसेल तर अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते.

केस गळणे थांबवण्यासाठी या गोष्टी करा –

हे सुद्धा वाचा

योग्य शांपूची निवड करा

आपल्या केसांसाठी योग्य शांपू निवडणे खूप महत्वाचे आहे. सल्फेट मुक्त आणि नैसर्गिक घटक असलेले शांपू तुमचे केस गळण्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. यासाठी, नैसर्गिक घटकांसह असलेला शांपू वापरा.

शांपूनंतर हेअर कंडीशनर वापरा

कंडिशनर तुमच्या केसांना कोट करतो, तसेच केस तुटणे कमी करतो. लीव्ह-इन कंडिशनर किंवा डिटेंगलर वापरा. प्रत्येक वॉशनंतर कंडिशनर लावल्याने केस तुटणे, आणि गळणे कमी होण्यास मदत होते. तुमचे केस मायक्रोफायबर टॉवेलमध्ये गुंडाळा जेणेकरून ते अधिक लवकर वाळतील.

केसांच्या वाढीसाठी स्काल्पला मसाज करा

स्काल्पला मसाज केल्याने केसांचे फॉलिकल्स ताणले जातात, ज्यामुळे केसांची जाडी वाढते. जर तुम्हाला तुमच्या केसांची वाढ किंवा जाडपणा वाढवायचा असेल तर तुम्ही दररोज 2 वेळा तुमच्या बोटांनी स्काल्पला मसाज करा.

पोषक तत्वांचे करा सेवन

तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश जरूर करा. केसांच्या वाढीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. निरोगी आणि वैविध्यपूर्ण आहार ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, लोह, व्हिटॅमिन-डी आणि बायोटिन यांचा समावेश आहे, केसांच्या आरोग्याला चालना मिळू शकते.

सिल्क पिलो कव्हर्स निवडा

सिल्क पिलो कव्हर्स तुम्ही झोपताना तुमच्या केसांना आधार देऊन केस चांगले राखण्यास मदत करतील. यामुळे केसांची वाढ होत नाही, परंतु केस निरोगी, लांब, आटोपशीर राहतात,

स्ट्रेस करा मॅनेज

तणाव आणि केस गळणे यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.

केसगळती रोखायची असेल तर या गोष्टी करणे टाळा

जास्त शांपू वापरू नका

जर तुमचे केस आधीच कोरडे किंवा खराब झाले असतील तर जास्त शांपू वापरल्याने तुमच्या केसांची आर्द्रता कमी होऊ शकते. यामुळे तुमच्या केसांना नुकसान होण्याचा धोकाही वाढतो

स्टायलिंग टूल्सचा अतीवापर टाळा

हीट-स्टायलिंगमुळे केस तुटणे, फाटणे आणि केसांचे इतर नुकसान होऊ शकते. पण जास्त उष्णता आणि गरम रोलर्स किंवा कर्लिंग इस्त्रीने केस वळवल्यास केस पातळ होऊ शकतात किंवा गळू शकतात.

केस घट्ट बांधू नका

केस खूप घट्ट बांधल्यास केसगळती वाढते. जर तुम्ही तुमचे केस मागच्या बाजूला घट्ट बांधले तर तुम्हाला ट्रॅक्शन एलोपेशिया होऊ शकतो. केसांवर वारंवार ओढल्याने केसांच्या फॉलिकलमधील केसांचा शाफ्ट सैल होतो.

गरम पाण्याने केस धुवू नका

गरम पाणी तुमच्या स्काल्पवरील नैसर्गिक तेल काढून टाकते, ज्यामुळे ते फ्रिजी किंवा अस्ताव्यस्त दिसतात. गरम पाण्यामुळे स्काल्प कोरडी होते. कोरडी होते ज्यामुळे कोंडा होतो आणि खाज सुटते. यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात आणि जास्त केस गळतात.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.