AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील या 5 वस्तू क्षणात चमकतील, ॲपल सायडर व्हिनेगरचा असा करा वापर

घरातील प्रत्येक कानाकोपरा स्वच्‍छ करताना खूप मेहनत घ्यावी लागते. जर तुमच्याकडे ॲपल सायडर व्हिनेगर असेल तर घरातील स्वच्छता करणे सोपे होऊ शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण घरातील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्या स्वच्छतेसाठी ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करताच त्या काही क्षणातच चमकादार दिसतील ते जाणून घेऊयात.

घरातील या 5 वस्तू क्षणात चमकतील, ॲपल सायडर व्हिनेगरचा असा करा वापर
apple-cider-vinegarImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Apr 28, 2026 | 3:39 PM
Share

ॲपल सायडर व्हिनेगरचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पण या व्यातिरिक्त या ॲपल सायडर व्हिनेगरचा उपयोग अनेक घरगुती कामांसाठी केला जाऊ शकतो, जसे की दुर्गंधी दूर करणे, चिवट डाग साफ करणे. जर काही घरातील गोष्टी सहज स्वच्छ होत नसतील तर ॲपल सायडर व्हिनेगर ने कामे सोपी करू शकते. यामुळे तुमचा वेळ वाचेल. तसेच तुम्हाला बाजारातून महागडे क्लीनर्स विकत घ्यावे लागणार नाहीत.

ॲपल सायडर व्हिनेगर वापरण्याचा एक सोपा उपाय म्हणजे ते पाण्यात मिक्स करून त्याचा वापर करणे, कारण ते आम्लधर्मी असल्यामुळे काही वस्तूंच्या स्वच्छतेसाठी ते योग्य ठरू शकणार नाही. जर तुम्हाला एखादी वस्तू स्वच्छ करायची असेल, तर एक भाग व्हिनेगर तितक्याच प्रमाणात पाण्यात मिक्स करा.चला तर मग घरगुती स्वच्छतेसाठी व्हिनेगरचा वापर कसा करता येईल हे जाणून घेऊयात.

काच आणि आरसे स्वच्छ करण्यासाठी उत्तम

काचेच्या खिडक्या आणि दारे, तसेच तुमच्या ड्रेसिंग टेबल किंवा वॉर्डरोबवरील आरसे स्वच्छ करण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करा. याच्या वापराने घरातील खिडक्या आणि आरसे काही क्षणातच चमकू लागतील. तर यासाठी ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करा आणि ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे मिश्रण कोणतेही डाग न ठेवता काच स्वच्छ करते.

कपडे स्वच्छ करण्यासाठी

ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर कपडे धुण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. कपडे पूर्णपणे धुतल्यानंतर, स्वच्छ पाण्यात अर्धा कप व्हिनेगर टाका. त्यानंतर, त्यात कपडे धुवा. यामुळे जीवाणू आणि दुर्गंधी दूर होईल. तसेच कपडे मऊ राहतील. तुमच्या कपड्यांवरील बुरशीचे डाग काढण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगर खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी, फक्त एक कप व्हिनेगर पाण्यात मिक्स करा त्यात कपडे भिजवा आणि 2-3 तासांनंतर धुवा.

मायक्रोवेव्ह चमकेल

मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करण्यासाठी एक उत्तम उपकरण आहे. मात्र सतत जेवण तेलकट पदार्थ वारंवार गरम केल्याने त्यात तेलकटपणा जमा होऊ शकतो. ते स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात व्हिनेगर टाका आणि ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. यामुळे संपूर्ण मायक्रोवेव्हमध्ये वाफ तयार होईल. त्यानंतर, मायक्रोवेव्ह एका कापडाने स्वच्छ करा. याव्यतिरिक्त तुम्ही व्हिनेगरच्या पाण्यात एक कापड भिजवूनही ठेवू शकता.

तांब्याची आणि पितळेची भांडी

तांब्याची आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर वापरू शकता. यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये मीठ टाकून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट भांड्यांना लावा आणि 10 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर, स्क्रबरने घासून स्वच्छ करा. तुमची तांब्याची आणि पितळेची भांडी चमकू लागतील.

सिंक साफ करणे

तुमच्या सिंकवर डाग पडले असतील किंवा तेलकटपणा साचला असेल, तर ॲपल सायडर व्हिनेगर खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी फक्त व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र मिक्स करा आणि सिंक स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करा. यामुळे तेलकटपणा, साबणाचे डाग आणि तेल काढून टाकण्यास मदत होते. याव्यतिरिक सिंकच्या पाईपमध्ये अडकलेला कचरा साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि ॲपल सायडर व्हिनेगरचे मिश्रण ड्रेनमध्ये ओता. गरज वाटल्यास त्यात खूप गरम पाणी टाका आणि स्वच्छ करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला.....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन.
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात....
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय...
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय....
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री...
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री....
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA...
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA....
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने...
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने....
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या..
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प....