चमकदार केस हवे असतील तर कोरफडीसह या पदार्थांचा करा वापर

केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. कोरफड ही केसांसाठी अतिशय प्रभावी ठरते.

चमकदार केस हवे असतील तर कोरफडीसह या पदार्थांचा करा वापर
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 3:55 PM

नवी दिल्ली – घनदाट , मजबूत आणि चमकदार केस (smooth and silky hair) असणं कोणाला आवडत नाही ? त्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय ट्राय करत असतात. तर काही जण सलूनमध्ये जाऊनही केसांसाठी उपाय करतात. हिवाळ्याच्या दिवसात आपले केस अनेक वेळा कोरडे आणि निर्जीव (dry hair)दिसू लागतात. केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी आणि ते चमकदार बनवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. कोरफड ही (aloe vera) केसांसाठी अतिशय प्रभावी ठरते. तिच्या वापरामुळे केस चमकदार बनतील.

आवश्यक घटक – कोरफड, 2 ते 4 चमचे खोबरेल तेल , 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

कोरफडीचे फायदे

हे सुद्धा वाचा

कोरफडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट केसांचे पोषण करण्यास मदत करतात. त्यामुळे स्काल्पचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. केस आणि स्काल्पच्या खोलवर स्वच्छतेसाठी कोरफड खूप फायदेशीर आहे.

खोबरेल तेलाचे फायदे

खोबरेल तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे केसांना मॉयश्चराइझ करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये असलेले अँटी फंगल तत्व केसांना कोंड्याच्या समस्येपासून वाचवते. तसेच केसांना चमकदार बनवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो.

व्हिटॅमिन ईचे फायदे

व्हिटॅमिन ई मध्ये असलेले घटक केसांची वाढ वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. तसेच, हे स्काल्प आणि केसांचे पोषण करण्यासाठी खूप उपयुक्त असते.

कसा करावा वापर ?

– केस गुळगुळीत आणि चमकदार बनवण्यासाठी एका भांड्यात कोरफडीचा गर काढा.

– त्यानंतर त्यात सुमारे 2 ते 4 चमचे खोबरेल तेल मिसळा.

– नंतर त्यात व्हिटॅमिन-ईची 1 कॅप्सूल घाला. हे तिन्ही घटक चांगले मिसळा.

– यानंतर, हे मिश्रण स्काल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत पूर्णपणे लावा.

– तुम्ही यासाठी ब्रश वापरू शकता.

– हा मास्क तुम्ही स्काल्पवर आणि केसांवर सुमारे 20 मिनिटे ठेवा.

– यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.