Weight Loss Tips: स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांनी वेगाने कमी होईल वजन

वजन वाढवणे जितके सोपे आहे तितकेच कठीण आहे वजन कमी करणे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासह आपल्या आहाराकडेही नीट लक्ष देणे खूप गरजेचे असते. स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता.

Weight Loss Tips: स्वयंपाकघरातील 'या'  पदार्थांनी वेगाने कमी होईल वजन
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 4:15 PM

नवी दिल्ली – आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे (junk food) सेवन यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा (obesity) सामना करावा लागतो. पण लठ्ठपणामुळे तुम्ही अनेक धोकादायक आजारांना बळी पडू शकता. अशा परिस्थितीत वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी (weight loss) लोक डाएटिंग, व्यायाम करतात. पण आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही पदार्थांमुळेही वजन नियंत्रित करता येते, हे तुम्हाला माहिती आहे का ? त्याबद्दल जाणून घेऊया.

1) मधाचे सेवन करा

मध हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतोच. त्याचे सेवन करून तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी कोमट पाण्यात मध मिसळून ते पाणी रोज रिकाम्या पोटी प्यावे. हे चरबी कमी करण्यास उपयुक्त आहे.

हे सुद्धा वाचा

2) हळद ठरते फायदेशीर

हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. ती अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. हळदीच्या नियमित सेवनाने तुम्ही लठ्ठपणाही कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी पाण्यात हळद घालून ते उकळून घ्यावे, आणि नंतर ते पाणी प्यावे.

3) दालचिनीचा करा वापर

दालचिनी ही अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याच्या वापरामुळे मेटाबॉलिज्म वाढते, ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही दररोज कोमट पाण्यासोबत दालचिनीचे सेवन करू शकता.

4) लिंबू ठरते प्रभावी

लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी आणि फायबर पुरेशा प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा आहारात समावेश करू शकता.

5) जिऱ्याचे सेवन करा

जिरे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजी फोडणील घालताना अनेक जण त्यात जिरं घालतात. वजन कमी करण्यासाठी देखील जिरं उपयुक्त ठरतं. त्यासाठी रात्रभर पाण्यात जिरं भिजवून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावं.

6) मेथी दाणे

मेथीचे दाणे किंवा बियांमध्ये फायबर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. याच्या सेवनाने पचनाच्या समस्यांवरही मात करता येते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.