टॉयलेटमध्ये मोबाईलवर तास न् तास घालवाल तर… सावधान होऊ शकतो मोठा आजार

जास्तीत लोक टॉयलेटमध्ये आपला वेळ घालवण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करतात. मात्र आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरणं मोठ्या आजारांचा आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हीही टॉयलेटमध्ये फोन वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

टॉयलेटमध्ये मोबाईलवर तास न् तास घालवाल तर... सावधान होऊ शकतो मोठा आजार
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 3:46 PM

मुंबई : प्रत्येकाला कोणती न् कोणती चांगली किंवा वाईट सवय असते. या सवयींमध्ये काही व्यक्तींना टॉयलेटमध्ये मॅग्झिन, पेपर, पुस्तकं वाचायला तर काहींना व्हिडीओ, गाणी ऐकायला पाहायला आवडतात. तर काही लोकांना मोबाईल फोन घेऊन जायची आणि फोनवर बोलण्याची सवय असते. कारण काही लोकांचं म्हणणं असतं की त्यांच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग ते टॉयलेटमध्ये करतात. मात्र टॉयलेटमध्ये मोबाईलवर तास न् तास तुम्ही घालवत असाल तर सावध व्हा…कारण ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

टॉयलेटमध्ये फोन वापरणं का धोकादायक?

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, टॉयलेटमध्ये फोन वापरणं हे आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे आरोग्यासंबंधी अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही टॉयलेटमध्ये बसून मोबाईलचा वापर केल्याने मूळव्याध होण्याचा धोका वाढतो, याला सामान्य भाषेत पाइल्स असेही म्हणतात.

तुम्ही स्वतः आजारांना आमंत्रण तर देत नाही ना?

तुमच्या घरात तुम्ही कितीही साफसफाई किंवा स्वच्छता करत असाल पण कोणत्याही घरात टॉयलेट ही स्वच्छ जागा मानली जात नाही. कारण टॉयलेटमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि याच ठिकाणी जर तुम्ही मोबाईल घेऊन तास न् तास बसत असाल किंवा तुमचा वेळ घालवत असाल तर ते बॅक्टेरिया तुमच्या फोनवर चिकटू शकतात. तर टॉयलेटमधून तुम्ही बाहेर आल्यानंतर त्याच फोनचा दिवसभर वापर करत असाल तर या फोनवरील बॅक्टेरिया तुमच्या शरीरात सहज एन्ट्री करू शकतात. ज्यामुळे तुम्ही स्वतः आजारांना आमंत्रण देतात.

वाईट सवयी शक्यतो टाळा

  • निरोगी आरोग्याला आजाराचं आमंत्रण देण्यापेक्षा तुम्ही प्राधान्याने टॉयलेटमध्ये मोबाईल फोन नेणं टाळा
  • जर तुमच्या घरात पाश्चिमात्य शैलीचं टॉयलेट असेल तर त्यावर बसताना पायाखाली लहानसा स्टूल घ्या, ज्यामुळे तुमची बसण्याची स्थिती सुधारेल

Non Stop LIVE Update
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.