AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teddy Day 2021 | व्हॅलेंटाईन वीकमध्ये का साजरा केला जातो ‘टेडी डे’? जाणून घ्या या मागची रंजक कथा…

व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी अर्थात 10 फेब्रुवारीला ‘टेडी डे’ साजरा केला जातो. या खास दिवशी आपण आपल्या जोडीदारास किंवा खास व्यक्तीला टेडी गिफ्ट देऊ शकता.

Teddy Day 2021 | व्हॅलेंटाईन वीकमध्ये का साजरा केला जातो ‘टेडी डे’? जाणून घ्या या मागची रंजक कथा...
टेडी डे 2021
| Updated on: Feb 10, 2021 | 11:09 AM
Share

मुंबई : व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी अर्थात 10 फेब्रुवारीला ‘टेडी डे’ साजरा केला जातो. या खास दिवशी आपण आपल्या जोडीदारास किंवा खास व्यक्तीला टेडी गिफ्ट देऊ शकता. टेडी इतके गोंडस असतात की प्रत्येकाला ते आवडतात. विशेषतः मुलींना टेडी बियर खूप आवडतात. या खास दिवशी, आपण आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी भेट देऊन मनातील प्रेम व्यक्त करू शकता (Valentine week teddy day 2021 special story).

‘टेडी डे’च्या निमित्ताने भेट देण्यापूर्वी, आपल्या जोडीदारास देण्यसाठी आपल्याकडे कोणत्या रंगाची टेडी आहे, आणि त्याचा अर्थ काय हे निश्चितपणे जाणून. घ्या कारण प्रत्येक रंगाच्या टेडीचा अर्थ वेगळा असतो. म्हणूनच, जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्यापूर्वी, कोणत्या रंगाचा टेडी द्यावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

का साजरा केला जातो ‘टेडी डे’?

जागतिक पातळीवर ‘टेडी डे’ साजरा करण्यामागे मोठा इतिहास आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती थियोडोर रुझवेल्ट एकदा मिसीसिपीवरून लुसियानाची यात्रा करत होते. त्यावेळी त्यांना झाडावर तडफडत असलेले अस्वल दिसले. या अस्वलाला तडफडताना पाहुन रुझवेल्ट यांनी त्याला मारण्याचा आदेश दिला.

अस्वलाला होत असलेल्या वेदना लक्षात घेऊन रुझवेल्ट यांनी हा आदेश दिला होता. त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण अमेरिकेत पसरली. या घटनेवर बेरीमेन नावाच्या व्यंगचित्रकाराने कार्टुन काढले. हे कार्टुन लोकांना खूपचं आवडलं. तसेच लहान मुलांच्या खेळण्या बनवणाऱ्या एका दुकानदाराच्या पत्नीने या अस्वलाचे खेळणे बनवले आणि त्याला ‘टेडी बियर’ असे नाव देण्यासाठी राष्ट्रपती रुझवेल्ट यांची परवानगी मागितली. कारण रुझवेल्ट यांचे टोपणनाव ‘टेडी’ होतं. त्यावेळी रुझवेल्ट यांनी या नावाला होकार दर्शवला. तेव्हापासून ‘टेडी बियर’ अस्तित्वात आला.

कोणता रंग काय सांगतो?

निळा टेडी बियर – निळा टेडी गिफ्ट करणे म्हणजे जोडीदारावर तुमचे खूप प्रेम आहे, ही गोष्ट व्यक्त करणे. जर तुम्हालाही प्रेम व्यक्त करायचे असेल, तर आपल्या आवडत्या व्यक्तीस निळा टेडी भेट द्या.

हिरवा टेडी बियर – हिरव्या रंगाचा टेडी भेट देणे म्हणजे आपण एखादा व्यक्ती आयुष्यात येण्याची वाट पाहत आहात. तर आपण आपल्या जोडीदाराला असे सांगायचे असेल की, आपण त्यांची वाट पाहत आहात, तर त्यांना हिरव्या रंगाचे टेडी पाठवा आणि नंतर त्यांच्या उत्तराची वाट पहा (Valentine week teddy day 2021 special story).

लाल टेडी बियर – लाल रंग केवळ प्रेमासाठी असतो, म्हणून जर तुम्हाला प्रपोज करायचा असेल तर त्यासाठी लाल टेडी बियर गिफ्ट करा.

गुलाबी टेडी बियर – गुलाबी टेडी गिफ्ट करणे म्हणजे आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीसह डेला जायचे आहे. आपण एखाद्यास डेटबद्दल विचारू इच्छित असल्यास, त्यांना गुलाबी रंगाचा टेडी भेट द्या.

नारिंगी टेडी बियर – नारंगी रंग म्हणजे आनंद, सूर्यप्रकाश, सर्जनशीलता आणि उत्साह. जर आपण एखाद्यास प्रपोज करण्याची योजना आखत असाल, तर आपण त्यांना केशरी रंगाचा टेडी देऊ शकता.

पांढरा टेडी बियर – पांढर्‍या रंगाचे टेडी गिफ्ट करणे म्हणजे आपण आधीपासून एखाद्याशी वचनबद्ध आहात आणि केवळ समोरच्या व्यक्तीशी मैत्री ठेवू शकता.

पिवळा टेडी बियर – पिवळा रंग जरी खूप सकारात्मक असला, तरी पिवळ्या रंगाचा टेडी भेट देणे म्हणजे आपल्याला आता ब्रेकअप करायचा आहे.

ब्राउन टेडी बियर – ब्राउन टेडी गिफ्ट करणे म्हणजे तुमच्यामुळे तुमच्या जोडीदाराचे मन दुखावले आहे.

काळा टेडी बियर – जर आपल्या जोडीदाराकडून आपल्याला ब्लॅक टेडी बेअर मिळाला, तर याचा अर्थ असा आहे की त्यांनी आपला प्रस्ताव नाकारला आहे.

जांभळा टेडी बियर – जांभळा टेडी गिफ्ट करणे म्हणजे समोरचा आता आपल्यात रस घेणार नाही आणि आता त्याला या नात्यात पुढे जाण्याची इच्छा नाही.

(Valentine week teddy day 2021 special story)

हेही वाचा :

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.