Valentine’s Week Calendar 2022 : 7 फेब्रुवारीपासून होतेय व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात, जाणून घ्या कोणता दिवस कधी साजरा करता येईल त्याबद्दल…

Valentine's Week 2022 full List : प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या वीकची सुरुवात रोझ डे पासून होते आणि या वीकमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. व्हॅलेंटाईन डे या वीकमधील सर्व शेवटचा दिवस असतो ,चला तर मग जाणून घेऊया रोझ डे पासून ते व्हॅलेंटाईन डे पर्यंतची संपूर्ण लिस्ट बद्दल...

Valentine’s Week Calendar 2022 : 7 फेब्रुवारीपासून होतेय व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात, जाणून घ्या कोणता दिवस कधी साजरा करता येईल त्याबद्दल...
(फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 1:33 PM

Valentine’s Week 2022 full List : फेब्रुवारीचा महिना लव बर्ड्स म्हणजेच प्रेमी युगुलांसाठी खूपच खास मानला जातो. या महिन्यांमध्ये व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week 2022)साजरा केला जातो ,या वीकची सुरुवात 7 फेब्रुवारी पासून होते आणि या दिवशी पहिला दिवस म्हणजेच रोझ डे (Rose Day) साजरा केला जातो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत व्हॅलेंटाईन डे पर्यंत हे दिवस साजरे केले जातात. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान येणारा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या दिवसाच्या नावाने साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये एक कपल दुसऱ्या कपलला फुल, चॉकलेट ,गिफ्ट इत्यादी देतात त्याचबरोबर व्हॅलेंटाईन वीक यायला काही दिवस उरले आहेत अशातच आज आम्ही तुम्हाला या वीक बद्दलची अशी पूर्ण लिस्ट(Valentine’s Week 2022 full List), सांगणार आहोत जेणेकरून तुमच्याकडून कोणताही दिवस साजरा करायचा नाही राहिला पाहिजे.

7 फेब्रुवारी रोझ डे

पहिला दिवस म्हणजे 7 फेब्रुवारी हा रोझ डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या पार्टनरला गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. लाल रंगाचे गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

8 फेब्रुवारी प्रपोज डे

जर तुम्ही एखाद्याशी लग्न करू इच्छित आहात तर 8 फेब्रुवारीचा दिवस यासाठी खूपच विशेष आहे. या दिवसाला प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. परंतु प्रपोज करते वेळी केक, फुलांचा गुलदस्ता,रिंग इत्यादी अनेक भेटवस्तू सोबत अवश्य घेऊन जा.

9 फेब्रुवारी चॉकलेट डे

9 फेब्रुवारीच्या दिवशी साधारणपणे चॉकलेट दिवस साजरा केला जातो. या दिवशी चॉकलेटचे अनेक गिफ्ट तुम्ही तुमच्या पार्टनरला भेट म्हणून देऊ शकता आणि त्याच्यासोबत सेलिब्रेट करू शकतात.

10 फेब्रुवारी टेडी डे

10 फेब्रुवारीला टेडी डे दिवस साजरा केला जातो. हा दिवस लहानपणाच्या आठवणी यांना ताजा करणारा दिवस मानला जातो. या दिवशी बहुतेक मुले आपल्या प्रेयसीला टेडी गिफ्ट करतात कारण की मुलींना टेडिबेअर खूपच आवडत असतात म्हणूनच आपल्या प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी अनेक मुले टेडी गिफ्ट म्हणून देतात.

11 फेब्रुवारी प्रॉमिस डे

11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जातो.या दिवशी आपल्या पार्टनरला नेहमी एकमेकांसोबत जीवनभर राहण्याचे वचन देतात आणि या दिवशी प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो.

12 फेब्रुवारी हग डे आपल्या पार्टनरला हग म्हणजे मिठी देऊन एक वेगळ्याच प्रकारचे सुख प्राप्त होत असते. या दिवशी आपल्या पार्टनरला हग म्हणजेच मिठीत घेऊन हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर आपले प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा सांगण्याचा हा दिवस असतो. अशावेळी पाटनर एकमेकांना मिठीत घेऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

13 फेब्रुवारी किस डे

13 फेब्रुवारीचा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या पार्टनरसोबत असलेले नातेसंबंध आणि बॉण्ड जो असतो त्याला अजून मजबूत बनवण्याचा दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी पार्टनरला कीस करून हा दिवस साजरा केला जातो.

14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे

14 फेब्रुवारीच्या दिवशी व्हेलेंटाईन दिवस साजरा केला जातो. हा या वीक मधील सर्व शेवटचा दिवस आहे.या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत एक चांगला कॉलिटी टाइम स्पेंड करू शकता तसेच तुमचे जे नाते आहे ते नाते घट्ट व यादगार बनवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्लॅन सुद्धा करू शकता जेणेकरून तुमचा प्रियकर व तुमची प्रेयसी हा दिवस नेहमी लक्षात ठेवेल.

ताप आणि अशक्तपणा वाटत असेल तर हे उपाय नक्की करा; तुमच्यासाठी नक्की फायदेशीर असतील

आयुर्वेदात कोणते घटक जास्त वापरले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्याही आहारामध्ये याचा समावेश करा आणि निरोगी राहा!

पहलगामला जाण्याचे नियोजन करत आहात? तर या ठिकाणांना आवश्य भेट द्या

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.