Bird Flu Alert |  ‘बर्ड फ्लू’पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा!

'बर्ड फ्लू' या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना आपणही काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Bird Flu Alert |  ‘बर्ड फ्लू’पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा!
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 6:22 PM

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशभरातच नव्हे तर, जगभरात हाहाकार मजला आहे. या परिस्थितीतून आपण सामान्य स्थितीत परतण्याची धडपड करत असतानाच ‘एव्हियन फ्लू’ अर्थात ‘बर्ड फ्लू’ या आजाराने पुन्हा डोकेवर काढले आहे. भारतातील निरनिराळ्या राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे काही राज्यात प्रशासनाने संक्रमित बदके, कोंबड्या आणि इतर पाळीव पक्षांना पकडण्यास सुरुवात केली आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यूमुळे देशभरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना आपणही काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. या रोगापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने ‘या’ गोष्टींचे कटाक्षाने पालन केले पाहिजे (We must avoid this things to stay safe from bird flu).

या गोष्टी करणे टाळा :

  1. अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
  2. कोंबडीचे मांस पूर्णपणे शिजल्याशिवाय खाऊ नका.
  3. पक्ष्यांशी थेट संपर्क टाळा.
  4. मांस उघड्यावर ठेवू नका.
  5. कच्च्या मांसाशी थेट संपर्क टाळा

या व्यतिरिक्त, आपण हातात ग्लोव्हज् न घालता मृत पक्ष्यांना स्पर्श करणे देखील टाळले पाहिजे. तसेच, आपण आपले हात वारंवार धुतले पाहिजेत. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे, आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. अतिरिक्त खबरदारीसाठी, कोंबडी किंवा कोंबडीशी संबंधित इतर उत्पादने हाताळताना चेहऱ्यावर मास्क आणि ग्लोव्हज वापरण्याची सवय लावा. केवळ 100 डिग्री सेल्सिअस तापमानावरच शिजवलेले मांस आणि इतर मांसाहारी पदार्थच खा. आजारी किंवा सुस्तावलेल्या कोंबडीपासून थेट संपर्क टाळा (We must avoid this things to stay safe from bird flu).

बर्ड फ्लूची लक्षणं काय?

H5N1 या विषाणूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

बर्ड फ्लू म्हणजे काय?

या आजाराचे  बरेच प्रकार आहेत. परंतु, H5N1 हा मानवाला संक्रमित करणारा पहिला एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. त्याची पहिली घटना 1997मध्ये हाँगकाँगमध्ये समोर आली होती. त्यावेळी पोल्ट्री फार्ममधील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव संक्रमित कोंबड्यांमुळे झाला होता.

H5N1 हा विषाणू पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवतो. परंतु, तो पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरतो. हा रोग संक्रमित पक्ष्याच्या मल, अनुनासिक स्राव, तोंडातील लाळ किंवा डोळ्यांतील पाण्याचे संपर्क आल्यास होतो. संक्रमित कोंबड्यांचे मांस 165ºF वर शिजवल्यास किंवा अंडी वापरल्यास त्याने बर्ड फ्लू पसरत नाही. परंतु, संक्रमित कोंबड्यांची अंडी कच्ची किंवा उकडून खाऊ नयेत.

(We must avoid this things to stay safe from bird flu)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.