Trekking Destinations | वीकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन करताय? मग, मुंबई-पुण्याजवळील या ठिकाणांना नक्की भेट द्या!

कोरोना काळात अनेक ट्रेकर्स घरात अडकून पडले आहेत. अनलॉक अंतर्गत आता काहीशी ढील मिळाल्यामुळे पुन्हा एकदा ट्रेकिंगला परवानगी देण्यात आली आहे. 

Trekking Destinations | वीकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन करताय? मग, मुंबई-पुण्याजवळील या ठिकाणांना नक्की भेट द्या!
सिंहगड

मुंबई : कोरोना काळात अनेक ट्रेकर्स घरात अडकून पडले आहेत. अनलॉक अंतर्गत आता काहीशी ढील मिळाल्यामुळे पुन्हा एकदा ट्रेकिंगला परवानगी देण्यात आली आहे. अशा वेळी सगळेच ट्रेकर्स ‘बॅग भरो आणि निकल पडो’च्या तयारीत आहेत. कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नसला तरी आवश्यक ती सगळी काळजी घेऊन सगळेच बाहेर पडण्यासाठी तयार झाले आहे. तुम्ही देखील या वीकेंडला ट्रेकिंगची योजना आखत असाल, तर मुंबई-पुण्याजवळील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या! (Weekend Trekking Destinations near Mumbai pune)

वेताळ टेकडी

वेताळ टेकडी हा पुणे शहरातीलतील एक महत्त्वाचा डोंगर आहे. पुण्याच्या पश्चिम दिशेला वसलेला ही डोंगर जैवविविधता आणि सौंदर्याच्या दृष्टीने पुणेकरांच्या आकर्षणाचे स्थान बनला आहे. पुणे शहराचा सर्वोच्च बिंदू याच टेकडीवर समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर आहे. वेताळ टेकडीचा विस्तार सुमारे साडेदहा चौरस किमी क्षेत्रात आहे. वेताळ टेकडी हे नाव त्या टेकडीवर असलेल्या वेताळबाबाच्या देवळामुळे आले आहे. सहज चालत वर चढत असताना आपण अनेक प्रकारचे वृक्ष, प्राणी आणि नैसर्गिक जैवविविधता पाहू शकता.

कोरीगड

लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्‍या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे, त्याच्या सद्यस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावाने ही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात. या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही. गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात. पेठशहापूर गावातून पायर्‍यांच्या सहाय्याने पाऊण तासात गडावर पोहोचता येते.

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकण्यास कठीण असा हा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्यावर ट्रेकिंगची योजना आखत असाल, तर मनाचीही थोडी तयारी करावी लागेल (Weekend Trekking Destinations near Mumbai pune).

रायगड

रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे 25 किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. स. 1674मध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केळे. हा किल्ला पायी चढत असताना इतिहासातील काही क्षणाची मनोमनी अनुभूती येते. किल्ल्याची भव्यता पाहून महाराजांच्या दूर दृष्टीचा अंदाज येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा देखील असून, त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.

माथेरान

मुंबईपासून फक्त 90 किमी अंतरावर असलेले हे हिल स्टेशन पश्चिम घाटांमध्ये समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर वसलेले आहे. हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे वाहनांना ज्याण्याची परवानगी नाही. येथे वृक्षाच्छादित भागांमधून आपण पायीच लांब फेरफटका मारू शकता. घोडेस्वारीदेखील करून शकता.

सिंहगड

सगळ्या ट्रेकर्सचा आवडता किल्ला म्हणजे पुण्यातला ‘सिंहगड’. ट्रेकरचा धीर पाहणारा किल्ला, माथ्यावर मात्र विलक्षण सुख देऊन जातो. किल्ल्यावर चढाई करताना आलेला सगळा त्राण गडावर पोहोचताच नाहीसा होतो. तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा हा ‘सिंहगड’ किल्ला पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला आहे. सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर या उपरांगेवर आहे. पुर्वीच्या काळात सिंहगडावर जाण्यासाठी दक्षेणेकडील कल्याण दरवाजा मार्ग वापरण्यात येत असे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला कल्याण नावाचे छोटेसे गाव आहे. तेथून हा मार्ग गडावर येतो. कोंढणपूर या पुर्व पायथ्याच्या गावातून दमछाक करणार्‍या वाटेनेही सिंहगडावर चढता येते. उत्तरेकडील खानापूर येथूनही सिंहगडावर चढाई करता येते, मात्र हा मार्ग म्हणजे लांब पल्ला. सिंहगडावर जाणार्‍या या मार्गाशिवाय सर्रास वापरला जाणारा सर्वात सोपा मार्ग म्हणजे उत्तर पायथ्याचा अतकरवाडीचा मार्ग. किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत वाहनानेदेखील जाता येते.

(Weekend Trekking Destinations near Mumbai Pune)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI