एक नाही तर चार प्रकारचे असतात मनुके, आरोग्यासाठी कोणते फायदेशीर ?
मनुका हा एक सुका मेवा आहे जो बहुतेकदा गोडपदार्थांमध्ये वापरला जातो. त्यातच मनुके हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. पण तुमच्यापैकी अनेकांना हे माहित नसेल की मनुकाचे फक्त एक नाही तर चार प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकाचे वेगवेगळे आरोग्य फायदे आहेत. चला तर आजच्या या लेखात आपण मनुक्यांचे फायदे जाणुन घेऊयात...

आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करत असतो. तर काही तज्ञ हे दररोज सकाळी मूठभर सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. सुक्या मेव्यांमध्ये मनुके खाणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही जर दररोज मनुके खाल्ले तर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासत नाही, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी राखली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की मनुकाचे एक-दोन प्रकार नाहीत तर चार प्रकार आहेत.
हिरवे मनुके, पिवळे मनुके, काळा मनुके आणि लाल मनुके अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये मनुक्यांचे हे चार प्रकार आहेत. तर या मनुक्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी वरदानपेक्षा कमी मानले जात नाही. पण कोणता मनुका जास्त फायदेशीर आहे याबद्दल अनेकांचा गोंधळ होत असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत या चार प्रकार असलेल्या मनुक्यांचे फायदेही वेगवेगळे आहेत. तर आजच्या लेखात आपण या मनुक्यांचे फायदे काय आहेत ते जाणुन घेऊयात…
मनुक्यांचे प्रकार आणि त्यांचे फायदे
पिवळे मनुके
पिवळे मनुके त्यांच्या गोड चवीसाठी ओळखले जातात. हे अनेक प्रकारच्या द्राक्षांपासून बनवले जाते. त्यामध्ये असलेली नैसर्गिक साखर रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. तसेच पचनसंस्था सुधारते.
काळे मनुके
काळे मनुके हे चवीकरिता आणि आकारासाठी ओळखले जातात. तर या काळ्या मनुक्यांमध्ये लोह आणि इतर पोषक तत्वांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. या मनुक्यांच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि शरीरात ऊर्जा वाढविण्यास मदत होते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
लाल मनुके
लाल मनुके लाल द्राक्षांपासून बनवले जातात. यामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि फायबर सारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे जे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तर या मनुक्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, हाडे मजबूत करण्यास, ऊर्जा वाढविण्यास मदत करते. लाल मनुके हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास देखील मदत करतात.
हिरवे मनुके
हिरवे मनुके त्यांच्या लांब आणि पातळ आकारासाठी ओळखले जातात. हे हिरव्या द्राक्षांपासून बनवले जाते. तर यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि व्हिटॅमिन सी सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असे मनुके आहेत. हिरवे मनुके तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
कोणते मनुके जास्त फायदेशीर ?
सर्व रंगांचे मनुके आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. प्रत्येक मनुक्यांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात. लाल मनुके तुमचे हृदय निरोगी ठेवतात. हिरवे मनुके तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि पिवळ्या मनुक्यात भरपूर फायबर असते जे पचन सुधारते. जरी प्रत्येक मनुक्यात लोह असते, परंतु काळ्या मनुक्यात मुबलक प्रमाणात लोह असते ज्यामुळे ते शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
