Boyfriend Jeans | बॉयफ्रेंड जीन्स असते तरी काय ? सगळ्या तरूणींना का लावलंय वेड ?

मार्केटमधली फॅशन दर दिवसागणिक बदलत असते. सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारचे आऊटफिट्सची धूम आहे. त्यापैकीच एक म्हणजे बॉयफ्रेंड जीन्स, सध्या त्याचा भलताट ट्रेंड आहे. ही जीन्स नेमकी असते तरी कशी ? चला, जाणून घेऊया..

Boyfriend Jeans | बॉयफ्रेंड जीन्स असते तरी काय ? सगळ्या तरूणींना का लावलंय वेड ?
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 3:17 PM

Boyfriend Jeans : आजकाल फॅशन जगतात बॉयफ्रेंड जीन्सची खूप क्रेझ आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपासून ते बॉलिवूडपर्यंत, ते सामान्य लोकांपर्यंतही अनेक तरूणी- महिला या जीन्सला पसंती देतात. एवढंच नव्हे तर बॉयफ्रेंड जीन्सची ही स्टाईल बऱ्याच काळापर्यंत लोकप्रिय राहील असे अनेक फॅशन तज्ज्ञांचं मत आहे. पम या जीन्सच्या नावामुळे जरा गोंधळ होतो खरा. ही जीन्स पुरुषांसाठी आहे, असं अनेकांना वाटतं. पण खरंतर तसं नाही, ही जीन्स महिलांसाठी, तरूणींसाठी आहे. याच्या नावाच्या उलट ‘बॉयफ्रेंड जीन्स’ची क्रेझ महिलांमध्ये अधिक पाहायला मिळत आहे. बॉयफ्रेंड जीन्स म्हणजे काय आणि सुरुवात कशी झाली, चला घेऊया..

बॉयफ्रेंड जीन्स म्हणजे काय ?

सध्या महिलांमध्ये बॉयफ्रेंड जीन्सची क्रेझ खूप पाहायला मिळत आहे. हा डेनिमचाच एक प्रकार आहे. जी घातल्यावर महिलांना खूप आरामदायक वाटत, पण ती तितकीच स्टायलिशही आहे. या जीन्समधील काही वैशिष्ट्यांमुळे ती इतर जीन्सपेक्षा वेगळी आणि बरीच स्टायलिश दिसते. काही लोक असं मानतात, की आधी स्त्रिया त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांची जीन्स घालत असत, कारण ती खूप आरामदायक होती. हेच लक्षात घेऊन कंपन्यांनी विशेषतः महिलांसाठी अशी जीन्स डिझाइन केली, जी आरामदायी तर असेल पण गबाळी न दिसता, एकदम स्टायलिश दिसेल.

बॉयफ्रेंड जीन्सचा इतिहास

सोशल मीडियावर बॉयफ्रेंड जीन्सची सध्या खूप क्रेझ आहे. ते पाहून तुम्हाला वाटेल की हा काहीतरी नवीन ट्रेंड आहे, पण असं नाही. उलट ही बऱ्याच काळापासून दिसणारी जीन्स आहे. अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल मर्लिन मनरोने काही वर्षांपूर्वी याची सुरुवात केली होती. तेव्हा तिने याचा उल्लेख ‘बॉयफ्रेंड जीन्स’ केला नसला, तरी 1960 च्या दशकातही ही आरामदायी जीन्स डेनिम प्रेमींची पहिली पसंती होती.

पण, 2000 च्या दशकात बॉयफ्रेंड जीन्स खरोखरच फोकसमध्ये आली. अभिनेता टॉम क्रूझची माजी पत्नी, केटी होम्सने ती जीन्स घातल्यावर बरीच चर्चा सुरू झाली होती. स्लिम फिट बॉडी आणि बॅगी जीन्स घातलेल्या केटीचा फोटो बऱ्याच फोटोग्राफर्सनी काढला आणि ती ट्रेंडमध्ये आली. स्त्रियांना सैल, आरामदायी डेनिममध्ये, जीन्समध्ये रस आहे, हे डेनिम ब्रांड्सच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यानंतर त्यांनी विशेषतः महिलांसाठी अशी बॉयफ्रेंड जीन्स बनवण्यास सुरुवात केली.

बॉयफ्रेंड जीन्स चे फायदे

– रेग्युलर जीन्सपेक्षा बॉयफ्रेंड जीन्स ही पाय आणि मांड्यांच्या इथे लूज, आरामदायी असते.

– इकडे-तिकडे धावताना किंवा फिरताना ही लूज जीन्स उत्तम वाटते. जास्त घट्ट नसते.

– फिरायाला जाताना जीन्स फोल्ड करणं सोपं जातं.

– फॉरएव्हर फॅशनेबल

– कमी उंची असणाऱ्या महिलांसाठी उत्तम पर्याय

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.