AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? जाणून घ्या मानसिक आरोग्यासाठी कसे ठरेल फायदेशीर

आजकाल डिजिटायझेशन इतके वाढले आहे की आता फोन आणि लॅपटॉपशिवाय कोणतेही काम करता येत नाही. आपल्याला इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे इतके व्यसन लागले आहे की, एक मिनिटही फोनशिवाय बसणे किंवा कोणतेही काम करणे आपल्यासाठी कठीण झाले आहे. तर अशातच एक टर्म अशी आहे जी खूप चर्चेत आहे ती म्हणजे डिजिटल डिटॉक्स.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?  जाणून घ्या मानसिक आरोग्यासाठी कसे ठरेल फायदेशीर
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: May 28, 2025 | 1:44 AM
Share

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अगदी छोट्या कामांसाठीही आपण आपला फोन शोधायला सुरुवात करतो. आपण त्यापासून क्षणभरही दूर राहू शकत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. पण तुम्हाला माहिती आहे का या सवयीचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होत आहे? अशा परिस्थितीत आजकाल एकच शब्द खूप ट्रेंड होत आहे – डिजिटल डिटॉक्स. हे डिजिटल डिटॉक्स तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवून, तुमचे आरोग्य नैसर्गिकरित्या चांगले ठेऊ शकता.

डिजिटल डिटॉक्समध्ये थोड्या वेळासाठी तुमचा फोन आणि लॅपटॉपचा वापर न केल्यास तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे फक्त एका निश्चित वेळी वापरा जेणेकरून त्याचा तुमच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.

‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणजे काय?

डिजिटल डिटॉक्सचा अर्थ असा नाही की तुम्ही फोन वापरणे थांबवावे. कारण फोनशिवाय तुमची बरीच कामे थांबतील. याचा अर्थ असा की तुम्ही दिवसाच्या 24 तासांत काही काळ फोन, लॅपटॉप किंवा टॅबलेट वापरू नये. तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप फक्त गरज असेल तेव्हाच वापरावा आणि काही वेळेसाठी तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद करा आणि काही वेळ एकटे किंवा कुटुंब किंवा मित्रांसोबत घालवावा. असे केल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते आणि तुमचा मेंदूही अधिक तीक्ष्ण काम करतो.

‘डिजिटल डिटॉक्स’ चे काय फायदे आहेत?

मानसिक आरोग्य निरोगी ठेवते

चांगल्या मानसिक आरोग्यासाठी गाढ झोप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही दिवसभर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत राहता तेव्हा त्याचा पहिला परिणाम तुमच्या झोपेवर होतो. तुम्हाला झोप येत नाही, ज्यामुळे नंतर नैराश्य आणि चिंता यासारखे अनेक आजार होतात. अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी फोन, लॅपटॉप आणि टीव्हीपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते.

शरीराला ऊर्जा मिळते

आजच्या युगात आपण तंत्रज्ञानावर इतके अवलंबून झालो आहोत की आपण आपले खरे सामाजिक जीवन विसरत चाललो आहोत. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत असतानाही आपण फोनवर व्यस्त असतो. अशावेळेस जर तुम्ही डिजिटल डिटॉक्सचा अवलंब केला तर ते तुमच्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबतही वेळ घालवता.

लक्ष केंद्रित करते

मोबाईलचे व्यसन सर्वांसाठी हानिकारक आहे. अशा परिस्थितीत डिजिटल डिटॉक्सचे पालन केल्याने तुमची मोबाईल वापरण्याची सवय कमी होते. जर स्क्रीन टाइम कमी असेल तर तुम्ही इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकता.

स्मरणशक्ती तीव्र होते

जेव्हा तुम्ही दिवसभर फोन, लॅपटॉप किंवा टीव्ही सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत नाही. जर तुम्ही तुमचा फोन आणि लॅपटॉप थोड्या काळासाठी वापरलात तर ते तुमचे मन मजबूत करते आणि तुम्ही जास्त काळ गोष्टी लक्षात ठेवू शकता.

स्वतःसाठी वेळ काढा

डिजिटल डिटॉक्सच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत एकटे वेळ घालवता तेव्हा तुम्ही तुमच्या कमतरतांकडे अधिक लक्ष देऊ शकता आणि स्वतःला चांगले समजून घेऊ शकता.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.