कुत्र्याने हल्ला केला किंवा हल्ला करायच्या तयारीत असेल तर काय करावे

Dog attacks : जगात कुत्र्यांचा हल्ला होण्याचं प्रमाण वाढत आहे. देशात दररोज दहा हजाराहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. भटकी कुत्री कधीही कोणावरही हल्ला करु शकतात. त्यामुळे त्यापासून तुम्ही कसे स्वताचे रक्षण करु शकता हे जाणून घेऊयात.

कुत्र्याने हल्ला केला किंवा हल्ला करायच्या तयारीत असेल तर काय करावे
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 6:15 PM

Dog Attack : भटके कुत्रे हल्ला करण्याचं प्रमाण भारतात वाढत चाललं आहे. कोणत्या व्यक्तीवर कुत्रा कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही. तुम्ही जर एखाद्या नवीन ठिकाणी गेलात तर याची शक्यता अधिक असते. कोणत्याही नवीन व्यक्तीला पाहिल्यानंतर कुत्रे त्यांच्यावर भुंकतात तर कधी कधी सरळ हल्ला करतात. कुत्रा कधीही एकत्र हल्ला करतात. त्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. आज आम्ही तुम्हाला कुत्र्यांपासून स्वत:चा बचाव कसा करावा याबद्दल माहिती सांगणार आहोत.

भटके कुत्रे पाठलाग करत असेल तेव्हा काय करावे?

भटके कुत्रे हे पाळलेल्या कुत्र्यांपेक्षा अधिक आक्रमक असतात. ते शक्यतो गटांमध्ये माणसावर हल्ला करतात. जर भटकी कुत्री तुमचा पाठलाग करत असतील तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवून स्वतःला वाचवू शकता.

भटका कुत्रा दिसला तर त्याला बघून लगेच घाबरून जावू नका. असे केल्याने कुत्र्यांना लगेच कळते की तुम्ही घाबरले आहात. त्यामुळे ते अधिक आक्रमक होऊ शकतात. कुत्र्यांच्या जवळ जाणे टाळा. कुत्र्यापासून लांब अंतर ठेवून चालत बाजुने निघून जा. यावेळी कुत्र्याकडे पाहू नका.

कुत्रा तुमच्याकडे येत असेल तर मागे जा. तुम्ही जर पाठ फिरवून पळून जाण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा पाठलाग करेल. त्यामुळे हळूहळू मागे जाण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या आजूबाजूला जर एखादे झाड, खुर्ची किंवा डस्टबिन असेल तर तुम्ही त्याचा वापर करु शकता. कवच म्हणून तुम्ही त्याचा वारर करु शकता.

हळू हळू मागे जात असताना देखील जर कुत्रा तुमचा पाठलाग करत असेल तर जोर जोरात ओरडा. गो अवे किंवा इशून निघून जा असं बोलत राहा. कुत्रा आवाजाने तिथून निघून जाईल.

कुत्र्याने तुमच्यावर हल्ला केल्यातर रक्षणासाठी तुम्ही हातात काठी, दगड, पिशवी ठेवू शकता. कुत्र्याच्या नाकावर किंवा डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही खाली पडले तर तुमची मान वाचवण्याचा प्रयत्न करा. स्वत: ला बॉलच्या आकाराने गुंडाळा. तुमचा चेहरा आणि मान सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्त करा.

तुम्हला कुत्रा चावला तर लगेचच तुम्ही वैद्यकीय मदत घ्या. कुत्र्याने तुम्हाला नुसते ओरखडे असले तरीही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुत्रा चावल्याने रेबीजसारखा आजार होऊ शकतो. लहान कुत्रा चावल्यानेही संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे अजिबात निष्काळजी राहू नका.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.