चहा बनवताना साखर नेमकी कधी घालायची आधी की नंतर? जाणून घ्या ‘ही’ योग्य पद्धत
प्रत्येकजण सकाळी उठताच त्यांचा आवडीचा चहा बनवून पितात. तर प्रत्येकवेळी चहा परफेक्ट बनतो असं नाही. खरं तर बहुतेकजण चहा बनवताना काही चुका करतात, ज्यामुळे चहाची चव खराब होते. तर आजच्या लेखात आपण चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे? तो कसा बनवायचा याचा कधी विचार केला आहे का? चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात...

आपल्या भारतात जवळजवळ सर्वांनाच चहा पिण्याची आवड आहे. तर बहुतेकांची दिवसाची सुरुवात चहाने होत असते. त्यात आपल्याकडे असेही चहाप्रेमी आहेत जे दिवसातून किमान 4 ते 6 वेळा चहा पितात. कारण हा चहा एक पेय नसून एक भावना आहे. तर हा चहा अतिशय वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कारण आपल्या घरातील चार माणसे चार वेगळ्या पद्धतीने चहा बनवतात आणि चव बदलते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार चहा बनवते. आले घालून चहा बनवला जातो, तर काहींना पाणी, चहापावडर, साखर घालून साधा चहा पिण्यास बनवला जातो.
चहाची चव त्यात घातली जाणारी चहापावडर आणि साखरेच्या प्रमाण यावर अवलंबून असते. काही लोकांना कमी चहापावडर आणि दूध असलेला चहा प्यायला आवडतो. तर काहींना कमी गोड आणि कमी दूध असलेला चहा आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का की चहा बनवण्याची योग्य पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे? बनवताना केलेल्या काही चुकांमुळे त्याची चव खराब होते. खर तर चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी या एका विशिष्ट वेळेला टाकायचे असतात ज्याने चहा हा एकदम परफेक्ट होतो. चला तर आजच्या लेखात आपण चहा बनवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.
चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
चहा बनवण्याची पहिली स्टेप म्हणजे गॅसवर एक चहाचे पातेल ठेवून त्यात पाणी टाकून ते उकळणे. पाणी उकळल्यानंतर त्यात चहा पावडर टाकून 2 मिनिटे पाण्यात उकळवा. जर तुम्हाला आले आणि वेलची घालून चहा प्यायला आवडत असेल तर तुम्ही यावेळी या गोष्टी घालू शकता. यामुळे चव आणखी चांगली होईल.
आता बहुतेक लोक दूध घातल्यानंतर साखर घालतात. पण असे करू नये. उलट चहा पावडर उकळल्यानंतर 3 ते 4 मिनिटांनी साखर घालावी. चहा पावडरची चव पाण्यात आल्यावर साखर टाका. आता साखर विरघळल्यानंतर दूध टाका. मंद आचेवर 5 ते 10 मिनिटे चहा उकळवा. यामुळे चहाचा रंग हळूहळू गडद होईल आणि चवही चांगली येईल.
चहा बनवताना या चुका करू नका
काही लोक पाणी न उकळता त्यात चहाची पावडर आणि साखर टाकतात. तुम्ही दुधासह चहा बनवत असाल किंवा ग्रीन टी. असे केल्याने, थंड पाण्यात चहा पावडर नीट उकळी जात नाहीत. यामुळे चहाची चव खराब होते.
यासोबतच, काही लोकांना असे वाटते की चहा पावडर किंवा दूध टाकल्यानंतर जास्त वेळ उकळल्याने चहाची चव चांगली येईल. पण तसे नाही, उलट त्यामुळे चहा कडू होतो. यामुळे गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या देखील उद्भवू शकते.
आपल्यापैकी अनेकजण चहा परफेक्ट बनवण्याच्या नादात त्यात जास्त चहा पावडर टाकतात. यामुळे त्याची चव खराब होऊ शकते. याशिवाय त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
काहीजण चहा बनवताना सर्व घटक एकाच वेळी योग्य प्रमाणात न टाकणे. जसे की चहा बनवताना पाण्यात आधी चहा पावडर टाकून उकळवतात व नंतर दूध घातल्यानंतरही साखर किंवा चहा पावडर टाकतात. यामुळे याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
