उन्हाळ्यात केसांना कोणतं तेल लावायचं? हेअर स्पेशालिस्ट जावेद हबीब यांनी सुचवलेलं तेल
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी केसांच्या आरोग्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. ते म्हणाले की, उन्हाळ्यात लोक केसांना तेल लावण्यास टाळाटाळ करतात, कारण चिकट आणि उष्णता जास्त असते. पण घाम, धूळ, उष्णता यामुळे केस कमकुवत होतात. त्यामुळे तेल लावणेही आवश्यक आहे.

मुंबई: केसांची योग्य काळजी घेतली तरच केस निरोगी, दाट, चमकदार आणि लांब होऊ शकतात. केसांचे आरोग्य राखण्यासाठी तेल आणि शॅम्पू करावा, असे हेअर स्पेशलिस्ट नेहमी सांगतात. हिवाळ्यात लोक केसांना तेल सहज लावतात, पण उन्हाळ्याच्या ऋतूत काही लोक याबाबत संभ्रमात असतात. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी केसांच्या आरोग्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. ते म्हणाले की, उन्हाळ्यात लोक केसांना तेल लावण्यास टाळाटाळ करतात, कारण चिकट आणि उष्णता जास्त असते. पण घाम, धूळ, उष्णता यामुळे केस कमकुवत होतात. त्यामुळे तेल लावणेही आवश्यक आहे. त्याआधी या ऋतूत तुमच्यासाठी कोणतं तेल सर्वात चांगलं ठरेल हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हेअर स्पेशालिस्ट जावेद हबीब यांनी एका खास तेलाबद्दल सांगितले आहे, जे प्रत्येकाने उन्हाळ्यात वापरावे. चला जाणून घेऊया…
उन्हाळ्याच्या ऋतूत केसांना निरोगी ठेवू शकणारे कोणतेही तेल असेल तर ते म्हणजे मोहरीचे तेल. तसेच हे तेल लावल्याने केस अधिक चमकदार आणि गुळगुळीत होतात. यासाठी केस धुण्यापूर्वी 1-2 तास आधी थोडे मोहरीचे तेल लावा आणि नंतर डोके धुवा. खरं तर मोहरीच्या तेलात ओमेगा-3, ओमेगा-6 आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे केसांची ताकद वाढवण्याचं आणि त्यात जीव ओतण्याचं काम करतात.
अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलात अँटी-डँड्रफ गुणधर्म असतात. हे तेल केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. हे टाळूची खाज देखील दूर करते.
उन्हाळ्यात केसांना तेल लावणं किती चांगलं?
उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्याचा नैसर्गिक मार्ग हेअर स्पेशालिस्ट जावेद हबीब यांनी सांगितला आहे. ते म्हणतात की, उन्हाळ्यातही केसांना कंडिशनिंगची गरज असते. कारण या ऋतूत डिहायड्रेशनची समस्या उद्भवते, ज्याचा परिणाम केसांसह शरीरावरही होतो. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेल न लावल्याने तुम्हाला केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)
