AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रँडेड कपड्यांवर Logo नेहमी डाव्या बाजूलाच का असतो?

आपण शर्ट, टी-शर्ट, जॅकेट किंवा युनिफॉर्म घेताना नेहमी पाहतो की त्यावरचा ब्रँड लोगो डाव्या बाजूला असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा लोगो उजवीकडे न ठेवता डावीकडेच का ठेवतात? ला, जाणून घेऊया यामागचं खास कारण.

ब्रँडेड कपड्यांवर Logo नेहमी डाव्या बाजूलाच का असतो?
ब्रँडेड कपड्यांवर डाव्या बाजूला का असतो लोगो? जाणून घ्या यामागचं खास कारणImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Jul 06, 2025 | 3:37 PM
Share

आजच्या फॅशनच्या जगात ब्रँडेड कपड्यांना खूप महत्त्व दिलं जातं. शर्ट, टी-शर्ट, जॅकेट्स यांसारख्या कपड्यांमध्ये बहुतांश लोक ब्रँडेड पर्याय निवडतात. ब्रँड हे केवळ क्वालिटीसाठी नाही तर स्टाइल आणि ओळखीचंही प्रतीक मानलं जातं. अशा वेळी एक गोष्ट तुम्ही नक्कीच पाहिली असेल बहुतेक ब्रँडेड कपड्यांवर त्यांचा लोगो डाव्या बाजूला असतो. पण का?

सर्वसामान्यपणे असं वाटतं की हा फक्त डिझाईनचा भाग असावा. पण प्रत्यक्षात, यामागे एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असतो जो ब्रँडिंग, मानसशास्त्र आणि वापरकर्त्याच्या भावनांशी जोडलेला असतो.

आपलं हृदय शरीराच्या डाव्या बाजूला असतं, ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शर्ट, टी-शर्ट किंवा जॅकेटवर लोगो डाव्या बाजूला लावलेला असतो, तेव्हा तो ‘दिलाच्या जवळचा’ वाटतो. यामधून ब्रँड आणि ग्राहक यांच्यात एक प्रकारचं भावनिक नातं निर्माण होतं. एक नजरेला भिडणारं, आणि मनात घर करणारं चिन्ह म्हणून लोगो डावीकडे दिला जातो.

दुसऱ्या कारणाकडे पाहिलं तर, मानवी मेंदू डाव्या बाजूच्या गोष्टींना आधी ओळखतो. मेंदूची एक नैसर्गिक क्रिया अशी असते की, समोर काही आलं की नजर सर्वप्रथम डावीकडे जाते. त्यामुळे कपड्यावर डाव्या बाजूला असलेला लोगो लगेचच लक्ष वेधतो. यामुळे कपड्याची ओळख, ब्रँडचं नाव किंवा चिन्ह झटपट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं.

तुम्ही लक्षात घेतलं असेल, की अनेक शालेय गणवेशांमध्ये, पोलिस किंवा लष्कराच्या युनिफॉर्ममध्ये नाव किंवा रँक डाव्या बाजूला असतो. हे केवळ एक योगायोग नाही, तर ही सवय अनेक क्षेत्रांमध्ये वापरली जाते. फॅशन इंडस्ट्रीतही हीच पद्धत स्वीकारली गेली आहे. त्यामुळे अनेक ब्रँड्स आपले लोगो डावीकडेच लावतात.

हे केवळ दृश्य सौंदर्य वाढवण्यासाठी नसतं. यामागचा हेतू म्हणजे लोकांच्या मनात त्या लोगोची, त्या डिझाईनची एक ठसठशीत छाप निर्माण करणे. जेव्हा ग्राहक पुन्हा तोच कपडा पाहतो किंवा वापरतो, तेव्हा डावीकडील लोगो लगेच ओळखता येतो. हाच भाग त्या कपड्याची ओळख ठरतो.

इतकंच नव्हे, तर डाव्या बाजूवरचा लोगो खरा आणि बनावट कपड्यांमध्ये फरक ओळखण्यासाठीही उपयुक्त ठरतो. जर लोगो नेहमीच्या जागी नसेल, तर त्या कपड्याची शंका घ्यायला हरकत नाही.

म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही ब्रँडेड कपडे खरेदी करत असाल, तेव्हा त्यावरील लोगो कुठे आहे याकडे लक्ष द्या. कारण तो केवळ स्टाइलचा भाग नसून, तुमचं त्या कपड्याशी, त्या ओळखीशी आणि त्या भावनांशी जोडलेलं नातं दर्शवतो.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.