झुरळांना पाहून का घाबरतात लोक? समोर आले विचित्र कारणे, 99 टक्के लोकांना माहीत नसेल
बरेचजण झुरळांना फार घाबरतात. काही जणांन भीती वाटते तर काहींना किळस येते. पण असं का होतं याचा कधी विचार केला आहे का? याची काही कारणे समोर आली आहेत. ही कारणे जाणून अनेकांना धक्का बसेल.

बरेच जण विविध प्राण्यांना आणि कीटकांना घाबरतात. त्यापैकी एक किटक आहे झुरळ ज्याला पाहिलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. महिलांमध्ये तर या किटकाची भलतीच भीती आहे. बरं झुरळ हे चावतही नाही तरी देखील त्याला पाहिलं की किळस येते किंवा घाबराला होतं. याची काही कारणे आता समोर आली आहेत. ती जाणून घेतल्यावर नक्कीच तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
त्यांची पोत किंवा त्याचं दिसणं
सहसा लोक झुरळांना त्यांच्या दिसण्यामुळे घाबरतात किंवा बरेच लोक त्यांच्या दिसण्याने तिरस्कार करतात. त्याच्याबदद् किळसवाणं वाटतं. कारण एकतर ते विचित्र, चिकट आणि तेलकट दिसतात, ज्यामुळे भीती आणि किळस निर्माण होते.
वेग
लोकांना झुरळांची भीती वाटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा वेग. खरं तर, झुरळे इतक्या वेगाने फिरतात की त्यांचा वेग पाहून लोक हैराण होतात, ज्यामुळे भीतीची प्रतिक्रिया निर्माण होते.
घाण
झुरळे बहुतेकदा घाणेरड्या किंवा अस्वच्छ वातावरणात आढळतात, म्हणूनच त्यांना पाहून अनेकदा घृणा येते आणि भीतीची भावना निर्माण होते.
आजारी पडण्याची भीती
झुरळांच्या भीतीचे एक कारण म्हणजे आजार. खरं तर, झुरळांमुळे साल्मोनेला, गॅस्ट्रोएन्टेराईटिससारखे आजार होऊ शकतात, ज्यामुळे लोकांना त्यांना पाहून घाबरायला होतं.
दुर्गंधी
झुरळांना एक विचित्र, तीक्ष्ण आणि घाणेरडा वास असतो, म्हणूनच बरेच लोक त्यांना घाबरतात.
संसर्गाची भीती
झुरळांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लोकांमध्ये चिंता आणि भीतीची भावना निर्माण करते.
शरीरावर रेंगाळतात
झुरळाच्या शरीराच्या रचनेमुळे, लोक ते पाहून अनेकदा घाबरतात आणि ते शरीरावर चढत आहे किंवा रेंगाळत आहे असे त्यांना वाटते.त्यामुळे अतिशय किळसवाणं वाटतं. म्हणून बहुतेकदा झुरळ पाहिलं की लोक एकतर घाबरतात किंवा किळसवाणेप्रमाणे पाहून दूर होतात.
तसेच जर घरातही झुरळे होत असतील तर लगेचच त्यावर उपाय शोधा अन्यथा आजारांना बळी पडाल. झुरळे आणि इतर कीटकांच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी, घर नेहमीच स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. तज्ञांच्या मते, नियमितपणे वापरात नसलेल्या आणि जास्त आर्द्रता असलेल्या कपाटांवर आणि स्वयंपाकघरातील सिंकवर अधिक लक्ष दिले पाहिजे. कारण जास्त आर्द्रता असलेल्या भागात झुरळं वाढण्याची शक्यता जास्त असते.
