AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: भूक लागल्यावर इतका राग का येतो? यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

आपल्याला रोज भूक लागते आणि ती भूक शमवण्यासाठीच आपण कमवत असतो. उपाशी पोटी माणसाला झोपच लागू शकत नाही. काही काळ उपासमार सहन करू शकता. पण उपाशी राहणं खूपच कठीण आहे. त्यामुळे अनेकांना भूक लागली की तळपायाची आग मस्तकात जाते. काही जणांना रागही येतो. चला जाणून घेऊयात या मागचं कारण..

GK: भूक लागल्यावर इतका राग का येतो? यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?
GK: भूक लागल्यावर इतका राग का येतो? यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?Image Credit source: Pexels
| Updated on: Jun 10, 2026 | 8:36 PM
Share

आपल्याला जगायचं म्हंटलं तर शरीराला अन्न आणि पोषक द्रव्ये मिळणं गरजेचं आहे. अन्न ही आपली पहिली मूलभूत गरज आहे. त्यानंतर इतर गरजा लागू पडतात. आपल्या पोटात वेळच्या वेळी अन्न पडलं तर आपल्याला सक्रिय आणि उत्साही राहण्यास मदत होते. अनेक जण काही काळ उपवास वगैरे करतात. पण उपवास सोडेपर्यंत मन अस्वस्थ असतं. उपाशी पोटी असताना काही जणांची नाहक चिडचिड होते. इतकंच काय तर दुसऱ्यांवर रागही काढला जातो. तुमचीही भूक लागल्यावर चिडचिड होते का? तुम्ही दुसऱ्यावर राग काढता का? असं वागण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत…

भूक लागल्यावर राग का येतो?

आपण उपाशी पोटी असलो की रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे आपली चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यावर, ग्लुकोजची पातळी सामान्य करण्यासाठी शरीर कॉर्टिसोल (एक तणाव संप्रेरक) आणि ॲड्रेनालाईन (धोकादायक परिस्थितीत सक्रिय होणारे संप्रेरक) स्रवते. दोन्ही संप्रेरक व्यक्तीमध्ये ‘लढा किंवा पळा’ (fight or flight) अवस्था, म्हणजेच तणाव आणि रागाची स्थिती, निर्माण करतात. यामुळेच बहुतेक लोकांना भूक लागल्यावर राग येतो. शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्या मेंदूवर ताण येतो. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होतो. त्यामुळे उपाशी पोटी असताना राग येणं सहाजिकच आहे.

भूक लागल्यावर शरीरात कोणते बदल होतात?

भूक लागल्यावर चिडचिड होते आणि एखाद्या कामावर लक्ष केंद्रीत करणं कठीण होतं. डोकेदुखी किंवा, हृदयाची वाढलेली धडधड आणि झोप याचा मनस्थितीवर परिणाम होतो. अशा स्थितीत तुम्हाला अन्नाची गरज असल्याचे संकेत मिळतात. जर याकडे कानाडोळा केला तर या सवयीमुळे तुमच्या मनस्थितीत फरक पडत जातो आणि तुमचा स्वभाव चिडचिडा होतो. मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

ग्लुकोजच्या कमतरतेमुळे मेंदूचा भावना आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते. अगदी लहानसहान गोष्टींवरील नियंत्रणही सुटते. त्यामुळे नियमितपणे थोडे थोडे जेवण घ्यावे आणि भूक लागताच पौष्टिक अन्न खावे. पौष्टिक अन्नामुळे तुम्हाला काही मिनिटांतच बरे वाटेल. भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही फळे किंवा सुकामेवा यांसारखे पौष्टिक पदार्थ खावेत. दर तासाला पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यासही मदत होते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा