पावसाळ्यात तुमची त्वचा तेलकट होतेय? ‘या’ टिप्स करा फॉलो
पावसाळ्यात वातावरण आल्हाददायक असते. तर या दिवसांमध्ये त्वचेच्या आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. आता अशा परिस्थितीत जर तुम्हीही या ऋतूत तुमच्या त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही त्वचेवरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल...

पावसाळा हा खूप आल्हाददायक ऋतू आहे. या ऋतूमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते कारण अशा ऋतूमध्ये अनेकांची त्वचा तेलकट होते ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम, ब्लॅकहेड्स, खाज सुटणे आणि जळजळ यासारख्या त्वचेच्या समस्या देखील उद्भवू लागतात. याचे कारण म्हणजे या ऋतूमध्ये वातावरणात जास्त आर्द्रता असते ज्यामुळे त्वचेवर चिकटपणा अधिक जाणवतो आणि त्वचा तेलकट वाटू लागते. तर आजच्या या लेखात आपण पावसाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी व त्वचेचा तेलकटपणा कसा कमी करता येईल याबद्दल तज्ञांकडून जाणून घ्या.
दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. दीपाली भारद्वाज यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळे तसेच घाम आणि मातीमुळेही अनेकांची त्वचा तेलकट होते. कारण आपल्या प्रत्येकाच्या त्वचेत नैसर्गिक तेल असते परंतु या ऋतूत हवामानात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने त्वचा अधिक तेलकट होऊ लागतो. त्यामुळे या ऋतूत तुम्हाला तुमच्या स्किन केअरमध्ये काही बदल करावे लागतील.
पावसाळ्यात त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी या टिप्स करा फॉलो
फेस वॉश योग्यरित्या वापरा
तुम्हालाही पावसाळ्यात तुमच्या त्वचेवर जास्त तेलकटपणा जाणवत असेल तर दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. जेणेकरून त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाईल.
हलके मॉइश्चरायझर वापरा
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी मॉइश्चरायझर निवडताना हे लक्षात ठेवावे की ते हलके असावे जेणेकरून ते तुमच्या त्वचेला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या त्वचेचे नुकसान होणार नाही.
सनस्क्रीन वापरण्याची खात्री करा
तुम्ही जर अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना असे वाटते की सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरावे, तर तुम्ही चुकीचे आहात. पावसाळ्यातही घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा आणि घरी असलात तरी वापरा. यामुळे तुमची त्वचा तेलकट होणार नाही.
वारंवार तोंडाला स्पर्श करू नका
जर तुम्हालाही वारंवार चेहऱ्याला स्पर्श करण्याची सवय असेल तर तुम्ही हे करणे टाळावे. कारण जर तुम्ही काम करत असताना हातांनी वारंवार चेहऱ्याला स्पर्श केला तर त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. ज्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते.
कमी मसालेदार पदार्थांचे सेवन करा
जर तुम्हाला तळलेले आणि मसालेदार पदार्थ खायला आवडत असतील तर पावसाळ्यात तेलकट व मसालेदार पदार्थ शक्य तितके खाणे टाळा. कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईलच पण ते तुमच्या त्वचेसाठीही हानिकारक ठरू शकते. म्हणून, तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी, तुमच्या आहारात जास्तीत जास्त फळे आणि आरोग्यदायी पेये समाविष्ट करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
