AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात त्वचेवर झटपट चमक हवीय तर ‘हा’ फेसपॅक लावा चेहऱ्यावर

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशा तऱ्हेने जर तुम्हाला या सीझनमध्ये लग्न किंवा फंक्शनला जाण्यापूर्वी इन्स्टंट ग्लो मिळवायचा असेल तर तुम्ही फेसपॅक बनवून घरात या गोष्टींचा वापर करू शकता. हे त्वचेला नैसर्गिक चमक प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

हिवाळ्यात त्वचेवर झटपट चमक हवीय तर 'हा' फेसपॅक लावा चेहऱ्यावर
| Edited By: | Updated on: Nov 26, 2024 | 3:51 PM
Share

लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली असून नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत लग्नसोहळा चालतो. अशावेळी आपल्या घरात नातेवाईक, मित्र किंवा शेजाऱ्याचे लग्नाचे निमंत्रण कार्ड आले च असेल, त्यामुळे लग्नात आकर्षक आणि स्टायलिश दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आउटफिटसोबतच ग्लोइंग स्किन महत्त्वाची भूमिका बजावते. हिवाळ्यात ऋतूमध्ये त्वचा कोरडी पडू लागते आणि कधी कधी त्वचेची चमक कमी होते.

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी लोकं विविध प्रकारचे फेशियल आणि अनेक गोष्टींचा अवलंब करतात. पण जर तुमच्याकडे पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर लग्नाला जाण्याच्या एक दिवस आधी तुम्ही स्क्रब करून हे फेसपॅक घरात बनवून चेहऱ्यावर लावू शकता. ते त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

कॉफी पावडर आणि नारळ तेल

कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी कॉफी पावडर आणि नारळ तेलाचा फेसपॅक फायदेशीर ठरू शकतो. तसेच, कॉफी पावडर एक्सफोलिएटरप्रमाणे त्वचा खोलवर स्वच्छ करण्यास मदत करू शकते. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. ते बनवण्यासाठी प्रथम 1 चमचा कॉफी पावडर आणि तितक्याच प्रमाणात खोबरेल तेल घ्या. आता दोन्ही नीट मिक्स करून सॉफ्ट पेस्ट तयार करा. आता हे 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

बेसन आणि कच्चे दूध

हा फेसपॅक बनवण्यासाठी दोन चमचे बेसनात तीन चमचे कच्चे दूध मिसळावे. त्यात थोडी हळद पावडरही घालू शकता. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा. रंग सुधारण्यासाठी, त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझिंग करण्यासाठी, त्वचा मऊ करण्यासाठी, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी हा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो.

मध आणि कॉफी

झटपट चमक मिळवण्यासाठी तुम्ही मध आणि कॉफीचा फेसपॅक देखील बनवू शकता. कॉफी त्वचेसाठी नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करते. हे त्वचेच्या मृत पेशी, पिग्मेंटेशन आणि टॅनिंग काढून टाकण्यास मदत करू शकते. त्याचबरोबर त्वचेला ओलावा आणि चमक देण्यासाठी मधात असलेले पोषक घटक फायदेशीर ठरू शकतात. हा फेक पॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे कॉफी पावडर, २ चमचे मध आणि १ चमचा कच्चे दूध घालून चांगले मिक्स करावे. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर १५ मिनिटे लावा आणि नंतर गोलाकार मोशनमध्ये मसाज करून स्वच्छ करा.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा