AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Care | हिवाळ्याच्या दिवसांत वाढते संसर्गाची शक्यता, आहारतील ‘हे’ घटक करतील शरीराचे संरक्षण!

या हंगामात बहुतेक लोक कोरडा खोकला, डोळ्यांना खाज सुटणे किंवा सर्दी यासारख्या समस्यांमुळे अस्वस्थ होतात.

Winter Care | हिवाळ्याच्या दिवसांत वाढते संसर्गाची शक्यता, आहारतील ‘हे’ घटक करतील शरीराचे संरक्षण!
लेट नाईट स्नॅक्स
| Updated on: Jan 06, 2021 | 11:38 AM
Share

मुंबई : हिवाळ्यात, बर्‍याच लोकांमध्ये अॅलर्जीची समस्या वाढते. या हंगामात बहुतेक लोक कोरडा खोकला, डोळ्यांना खाज सुटणे किंवा सर्दी यासारख्या समस्यांमुळे अस्वस्थ होतात. खाण्यापिण्याच्या काही गोष्टीही अॅलर्जी वाढवण्याचे काम करतात, तर काही घटक यावर औषधाप्रमाणे काम करतात. अशी हंगामी अॅलर्जीची समस्या टाळण्यासाठी आपण ‘या’ गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत. चला तर, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…(Winter care this food may help ease your allergies)

आले

अॅलर्जीची समस्या कमी करण्यात आले सर्वात प्रभावी मानले जाते. न्यूजर्सीच्या प्रसिद्ध इम्युनोलॉजिस्ट स्टेसी गॅलझिट्झ यांनी एका हेल्थ वेबसाईटला माहिती देताना सांगितले की, ‘आले आणि त्याच्या अर्कांमध्ये औषधी गुणधर्म आहेत जे मळमळ, वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यात आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अॅलर्जीवर देखील प्रभावीपाने काम करतात. हंगामी अॅलर्जी टाळण्यासाठी आपल्या आहारात आल्याचा समावेश करा.

हळद

हळद देखील अॅलर्जी आणि संसर्ग कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. हळदीमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. डॉक्टर गॅलझिट्झ म्हणतात, ‘हळदीत आढळणाऱ्या कर्क्यूमिनमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-अॅलर्जीक गुणधर्म आहेत. डॉक्टर गॅलझिट्झ म्हणतात की, हळदीचा सर्वाधिक फायदा होण्यासाठी मिरपूडबरोबर हळदीचे सेवन करावे.

सॅलमन फिश

फारच कमी लोकांना माहिती आहे की, सॅलमन मासा संसर्ग कमी करण्यास देखील उपयुक्त ठरतो. डॉक्टर गॅलझिट्झ म्हणतात, “सॅलमन, सार्डिन आणि मॅकेरल सारख्या फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळते. जे शरीरात अॅलर्जी आणि सूजेवर आराम देतात.” 2007मध्ये अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या जपानी अभ्यासानुसार असे आढळले आहे की, जास्त मासे खाणार्‍या स्त्रियांना तापाची समस्या कमी उद्भवते (Winter care this food may help ease your allergies).

टोमॅटो

टोमॅटोमध्ये व्हिटामिन-सी भरपूर प्रमाणात आढळते. या व्यतिरिक्त अॅलर्जीविरुद्ध लढा देणारे सर्व आवश्यक घटक टोमॅटोमध्ये आढळतात. टोमॅटोमध्ये आढळणारा लाइकोपीन हा एक अँटीऑक्सिडेंट कंपाऊंड आहे. ज्यामुळे शरीरातील दाह कमी होतो. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार लाइकोपीन दम्याच्या रूग्णांची फुफ्फुसे सुधारते.

तिखट

तिखट आणि मसालेदार आहार शरीरातील अॅलर्जी कमी करतो. बडीशेप, मोहरी आणि काळी मिरी या गोष्टी नैसर्गिक कफनाशक आहेत. त्यांचे सेवन केल्याने बंद नाक उघडते आणि कफ बाहेर येते. तिखट आहार घेतल्यामुळे कफ, डोकेदुखी सारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

मध

हंगामी अॅलर्जीशी टाळण्यासाठी मध खूप फायदेशीर आहे. यामुळे घसा खवखवणे कमी होते आणि शरीराला आतून उबदारपणा मिळतो. तथापि, काही लोकांना मधापासून देखील अॅलर्जी असते. म्हणून, मधाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांशी संपर्क साधा.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Winter care this food may help ease your allergies)

हेही वाचा :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.