Skin Care Tips For Men | हिवाळ्यातही दिसा ‘हँडसम’, ‘या’ टिप्स वापरा आणि घ्या आपल्या त्वचेची काळजी…

| Updated on: Dec 21, 2020 | 6:30 PM

स्त्रिया आपल्या त्वचेची खूप काळजी घेतात. परंतु पुरुष आपल्या त्वचेची हवी तितकी काळजी शक्यतो घेत नाहीत.

Skin Care Tips For Men | हिवाळ्यातही दिसा ‘हँडसम’, ‘या’ टिप्स वापरा आणि घ्या आपल्या त्वचेची काळजी...
Follow us on

मुंबई : हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत स्त्रिया आपल्या त्वचेची खूप काळजी घेतात. परंतु पुरुष आपल्या त्वचेची हवी तितकी काळजी शक्यतो घेत नाहीत. जर आपण आपल्या चेहऱ्यायाकडे लक्ष दिले नाही तर, त्यामुळे आपला चेहरा हिवाळ्यात निर्जीव भासू लागतो.  एक वेगळीच सुस्ती जाणवू लागते. सुस्त दिसणारी त्वचा बहुतेकदा चेहऱ्यावर मृत पेशी तयार होण्यास कारणीभूत ठरते. ज्यामुळे प्रकाश त्वचेवर प्रतिबिंबित होण्यास प्रतिबंधित होते. मृत त्वचेपासून मुक्त होण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा चांगली स्क्रब करणे, आणि आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करणे गरजेचे आहे (Winter Special Skin Care Tips For Men).

मॉइश्चरायझर वापरा.

वर्षभर आणि विशेषत: हिवाळ्यात मॉइश्चरायझरचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. त्वचा कोरडी पडण्याची समस्या टाळण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. मॉइश्चरायझिंग क्रीमचा दररोज वापर केल्याने आपल्या त्वचा रंगही उजळतो. तसेच, डोळ्याखालची काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

रात्री सीरम वापरा.

आपला चेहरा अधिक हायड्रेट करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर सीरम लावा. यामुळे चेहरा जास्त कोरडा पडणे, मुरुमांचे चट्टे व डाग यासारखे आपल्या त्वचेशी संबंधित समस्या कमी होतील.

सनस्क्रीन लावण्यास कधीही विसरू नका.

हिवाळ्यात, तापमानात सतत कमी होत असल्याने आपल्याला पुरेशा सूर्यप्रकाश मिळू शकत नाही आणि याकाळात आपल्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका देखील जास्त असतो. अशावेळी सनस्क्रीन वापरणे अधिक फायद्याचे ठरते. सनस्क्रीन हानिकारक अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करते,. त्याच बरोबर अकाली वृद्धत्व आणि मेलेनोमा सारख्या समस्यांपासून देखील आपले संरक्षण करते (Winter Special Skin Care Tips For Men).

असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण हिवाळ्याच्या हंगामातही तरूण आणि हँडसम दिसू शकता. हे सर्व उपाय केल्यावर आपला चेहरा निस्तेज दिसणार नाही. या हिवाळ्याच्या हंगामात, त्यांना आपल्या रोजच्या नित्यक्रमात या गोष्टींचा नक्कीच समावेश करा.

आहारात बदल आवश्यक!

जर खरोखरच आपण आपल्याला चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायचा प्रयत्न करत असाल, तर प्रथम आपल्या खाण्याच्या सवयीत सुधारणा करणे आवश्यक आहे. केवळ या सवयी बदलल्यानंतरच, कोणताही घरगुती उपचार आपल्या त्वचेवर प्रभावी ठरू शकतो. यासाठी बाहेरील खाद्यपदार्थ, जंकफूड आणि फास्टफूड खाणे शक्यतो टाळा. चहाऐवजी अँटीऑक्सिडंटनी समृद्ध ग्रीन टी पिण्यास सुरुवात करा. हे अँटीऑक्सिडंट चेहरा आणि त्वचा उजळ करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. याशिवाय हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे भरपूर प्रमाणात सेवन करा. मोड आलेले कडधान्य खा आणि भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.

(Winter Special Skin Care Tips For Men)

हेही वाचा :