ये काली काली आँखे…. डार्क सर्कल्स हटवण्यासाठी करा सोपा उपाय, त्वचाही होईल चमकदार
अनेक लोकांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं किंवा डार्क सर्कल्स दिसतात, जे सहजपणे जात नाही. अशा वेळी केळं आणि कोरफड यांच्या मदतीने तुम्ही डार्क सर्कल्स सहज हटवू शकाल तसेच त्वचेच्या अनेक समस्याही दूर होऊ शकतील.

नवी दिल्ली – काही वेळेस त्वचेची विशेष काळजी घेतल्यानंतरही (skin care routine) डोळ्यांखाली काळी वर्तुळे अथवा डार्क सर्कल्स (Dark circles)दिसतात. अशा वेळी लोक डोळ्यांखालील काळेपणा दूर करण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र त्यानंतरही ही डार्क सर्कल्स पूर्णपणे जात नाही. तुम्हीसुद्धा डार्क सर्कल्सच्या समस्येने त्रस्त असाल तर काही साधे, सोपे उपाय करून, काही गोष्टींचा वापर करून डार्क सर्कल्स दूर करू शकता, तसेच त्वचेवर चमक (glowing skin) देखील आणू शकता.
डार्क सर्कल दूर करण्यासाठी बाजारात अनेक महागडी उत्पादने उपलब्ध असतात, पण त्यामुळे ही समस्या पूर्णपणे दूर होतेच असं नाही. तसेच या उत्पादनांच्या वापरामुळे डोळ्यांवर दुष्परिणामही दिसू शकतात. काही नैसर्गिक उपायांच्या मदतीने तुम्ही डार्क सर्कल्सची समस्या सहज दूर करू शकता. त्यामुळे तुमचा चेहरा डागविरहीत व सुंदर दिसू शकेल.
डार्क सर्कल्सचे प्रकार
डोळ्यांखाली येणारी ही डार्क सर्कल्स सहसा तपकिरी, काळी आणि निळ्या रंगाची असतात. अशा स्थितीत हायपरपिग्मेंटेशनमुळे डोळ्यांवर तपकिरी रंगाची गडद सर्कल्स पडतात. त्याच वेळी, त्वचेचे कोलेजन कमी झाल्यामुळे, डोळ्यांखाली काळ्या रंगाची डार्क सर्कल्स तर झोपेच्या कमतरतेमुळे निळ्या रंगाची सर्कल्स दिसू लागतात.
डार्क सर्कल्सचे कारण
डार्क सर्कल्स होण्यामागे अनेक कारणे असतात. शरीरात मेलानिनचे उत्पादन जास्त झाल्यास, तसेच एग्झिमा आणि पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे म्हणजेच डिहायड्रेशनमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात.
डार्क सर्कल्स कमी करण्याचे उपाय
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. त्यासाठी एक केळ घेऊन ते मॅश करावे. त्यामध्ये अर्धा चमचा कोरफड जेल मिक्स करून डार्क सर्कल्सवर लावावे व हलक्या हाताने डोळ्यांखाली मसाज करा. थोड्या वेळाने ही पेस्ट सुकल्यानंतर डोळ्यांखालील भाग व चेहरा स्वच्छ धुवावा. ही पेस्ट लावल्याने काय फायदे मिळतात ते जाणून घेऊया.
त्वचेचे मॉयश्चरायझर अबाधित राहते
केळी आणि कोरफड यांचे मिश्रण त्वचेचा कोरडेपणा दूर करून आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे डोळ्यांची त्वचा मॉयश्चराइज्ड आणि मुलायम राहते.
सूज दूर होते
औषधी घटकांनी समृद्ध असलेले कोरफड जेल हे डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत, ही पेस्ट नियमितपणे लावल्याने डार्क सर्कल्ससह, सूज देखील कमी होऊ लागते.
