Skin Care : पिंपल्स, डार्क सर्कल आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ फेसपॅक फायदेशीर!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Oct 26, 2021 | 10:30 AM

आपण जवळपास सर्वचजण बटाट्यांची भाजी खातो. बटाटा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, बटाटा फक्त आरोग्यासाठीच नव्हेतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आपण घराच्या घरी बटाट्याचा फेस मास्क, फेसपॅक तयार करू शकतो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

Skin Care : पिंपल्स, डार्क सर्कल आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' फेसपॅक फायदेशीर!
त्वचेची काळजी

मुंबई : आपण जवळपास सर्वचजण बटाट्यांची भाजी खातो. बटाटा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, बटाटा फक्त आरोग्यासाठीच नव्हेतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आपण घराच्या घरी बटाट्याचा फेस मास्क, फेसपॅक तयार करू शकतो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे बटाट्याचा रस केसांसाठी देखील फायदेशीर आहे.

बटाटा आणि अंडे

ज्याप्रमाणे बटाटा आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे अंडे देखील आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. अंडे आणि बटाट्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक बटाटे किसून बारीक करून घ्या आणि त्यामध्ये एक अंडे मिक्स करा. याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत मिळते.

हळद आणि बटाटा

बटाट्याची बारीक पेस्ट तयार करा. त्यामध्ये एक चमचा हळद मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट दहा मिनिटे तशीच ठेवा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळानंतर चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून दोन वेळा वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

बटाटा आणि काकडी

2 कापसाचे गोळे, बटाटा रस, काकडीचा रस घ्या. यासाठी आपल्याला बटाट्याच्या रसामध्ये काकडीचा रस समान प्रमाणात मिसळावा लागेल आणि कापसाच्या सहाय्याने डार्क सर्कल्सवर लावावा लागेल. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटांनंतर धुवा. यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावली पाहिजे.

बटाट्याचा रस

बटाटा धुवून तो मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढा. या सर्व गोष्टी बटाट्याच्या रसात मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. पेस्ट कोरडे झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. बटाटे फायबर, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोहयुक्त असतात. सुरकुत्या, कोरडी त्वचा, लालसरपणा आणि काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस आपण चेहऱ्याला लावू शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(This home remedy is beneficial for eliminating the problem of pimples and dark circles)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI