Yoga : वर्क फ्रॉम होममुळे बसण्याची सवय बदललीय? मग ‘हे’ व्यायाम नक्की ट्राय करा

| Updated on: May 31, 2021 | 2:31 PM

कोरोना विषाणूच्या साथीमुळे आपली जीवनशैली खूप बदलली आहे. यावेळी आपल्या कामाच्या पध्दतीतही बदल झाला आहे.

Yoga : वर्क फ्रॉम होममुळे बसण्याची सवय बदललीय? मग हे व्यायाम नक्की ट्राय करा
व्यायाम
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीमुळे आपली जीवनशैली खूप बदलली आहे. यावेळी आपल्या कामाच्या पध्दतीतही बदल झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत लोक घरून काम करत आहेत. डेस्कवर काम करणाऱ्या लोकांना बराच वेळ एका जागी बसून काम करावे लागत आहे. यामुळे मान, पाठ, कंबर आणि डोळ्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोनामुळे जिम आणि व्यायामासाठी बाहरे पडणे देखील शक्य होत नाहीये. (Work from home is on, so follow these tips)

यासर्वांमध्ये आपण घरी बसून व्यायाम करू शकतो. व्यायाम केल्याने आपल्या पाठीच्या, मानेच्या आणि कंबरेचा समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच व्यायाम केल्याने आपले शरीरही तंदुरूस्त राहते. दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. यामुळे आपले वजन झटपट कमी होते.

चक्रासन हे आसन करण्यासाठी आपल्या पाठीवर अगोदर झोपावे लागेल. त्यानंतर दोन्ही हात आणि पाय जमिनीवर ठेवा आणि आपले संपूर्ण शरीर पाय आणि हाताच्या आधारे उचला. यामुळे अर्धा गोलाकार तयार होईल. हे आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. हे आसन केल्यावर पाठ, कंबर, पोट, हात आणि पायांवर थोडा ताण येतो. साधारण वीस मिनिटे हे आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. आसनादरम्यान कोणत्याच प्रकारची हालचाल करायला नको. विशेष टिप म्हणजे हे आसन करताना कोणालाही बोलणे टाळा. हे आसन केल्याने पाठी दुखी दूर होते.

ओम ब्रीदिंग एक्सरसाइज
स्टेप 1: आपण पाठ ताठ ठेवून सरळ बसा.
स्टेप 2: आता आपल्याला दोन्ही हात आपल्या खालच्या उदरच्या बाजूला ठेवा.
स्टेप 3: आता, आपल्या नाकातून सखोल आणि हळू श्वास घ्या आणि आपले तोंड बंद ठेवा.
स्टेप 4: आता, ओम म्हणत श्वासोच्छवास सोडा.
स्टेप 5: आता ही प्रक्रिया नऊ ते दहा वेळा पुन्हा करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(Work from home is on, so follow these tips)