AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Hand Washing Day | 20 सेकंदात जंतूंचा नाश, कोरोना विषाणू संक्रमणामुळे ‘हात धुण्याचे’ महत्त्व अधोरेखित!

हात धुणे हा कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. यामुळे संक्रमणाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो

World Hand Washing Day | 20 सेकंदात जंतूंचा नाश, कोरोना विषाणू संक्रमणामुळे ‘हात धुण्याचे’ महत्त्व अधोरेखित!
| Updated on: Oct 15, 2020 | 4:26 PM
Share

मुंबई : कोरोना संकटामुळे लोकांमध्ये हात धुण्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. ही सवय कायम ठेवून कोरोना व्यतिरिक्त इतर अनेक संसर्गजन्य रोग टाळता येऊ शकतात. अनेक लोक हात न धुताच अन्नपदार्थ खातात, यातूनच अनेक प्रकारचे आजार पसरतात, असे डॉक्टर म्हणतात. हात धुण्याच्या सवयीमुळे अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोगांचा पराभव केला जाऊ शकतो. दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक हात धुण्याचा दिन’ (World hand Washing Day) म्हणून साजरा केला जातो. परंतु, यंदा कोरोनामुळे या दिवसाचे महत्त्व लक्षणीय झाले आहे. (World hand Washing Day Importance of Clean hands)

तज्ज्ञांच्या मते, बाहेरून घरात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने 30-40 सेकंदांपर्यंत आपले हात धुतलेच पाहिजेत. जेणेकरून कुठलाही विषाणू हातावर असेल, तर तो नष्ट होऊन, संसर्गाची शक्यता कमी होते. यावर्षी मात्र सर्वांनाच हात धुण्याचे महत्त्व समजले आहे.

कोरोनामुळे हात धुण्याबद्दल जागरूकता वाढली

अवंतीबाई महिला रुग्णालयातील ज्येष्ठ बालरोग विशेषज्ञ डॉ. सलमान यांनी सांगितले की, साबणाने हात धुण्यामुळे अतिसार, कावीळ यासारख्या आजारांना टाळता येऊ शकते. शौचानंतर आणि जेवणापूर्वी प्रत्येकाने साबणाने हात धुण्याची सवय लावून घेतली पाहिजे. हात धुण्याच्या सवयीमुळे सुमारे 80 टक्के आजार टाळता येतात. हात धुल्यानंतर कपड्याने हात पुसू नये, हवेत वाळवावे. यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. लहान मुलांसाठी स्पर्श करण्यापूर्वी हात धुणे बंधनकारक आहे. (World hand Washing Day Importance of Clean hands)

कोरोना विषाणू संकटामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. जर हे सातत्य कायम ठेवले गेले तर, इतर संसर्गजन्य रोगांनाही आळा घालता येणे शक्य होणार आहे. याचा अभ्यासक्रमात समावेश करणे देखील आवश्यक आहे. रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणाहून परत आल्यावर हात धुण्याची सवय असणे गरजेचे आहे.

केजीएमयूच्या औषध विभागाचे प्राध्यापक अरविंद मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, हात धुणे हा कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. यामुळे संक्रमणाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. डब्ल्यूएचओच्या नियमावलीमध्ये देखील हात धुण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यासाठी डब्ल्यूएचओ आणि युनिसेफच्या नेतृत्वात नुकतीच ‘हॅन्ड हायजीन फॉर ऑल ग्लोबल इनिशिएटिव्ह’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. (World hand Washing Day Importance of Clean hands)

हातांची स्वच्छता आरोग्यासाठी अनिवार्य

हाताची स्वच्छता हा आपल्या निरोगी आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. साबणाने हात स्वच्छ धुतल्याने बर्‍याच आजारांना टाळता येऊ शकते. अस्वच्छ हातांद्वारे अनेक सूक्ष्मजंतू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात.

बलरामपूर हॉस्पिटलचे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. देवेंद्र सिंह म्हणतात की, कोरोना संक्रमणानंतर बर्‍याच लोकांनी जबाबदारी म्हणून या सवयीचा स्वीकार केला आहे. तर, काहीजण संसर्गाच्या भीतीने हात स्वच्छ ठेण्याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. हात स्वच्छ ठेवल्याने अतिसार, टायफॉइड, पोटाचे आजार, डोळ्यासंबंधित संक्रमण, त्वचा रोग इत्यादीपासून आपला बचाव होऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

Coronavirus: घरातच कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका, बचावासाठी करा 3 उपाय

(World hand Washing Day Importance of Clean hands)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.