उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवणारा गोंद कतीरा आहे तरी काय? जाणून घ्या त्याबद्दल
उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी डिंकाचा प्रकार असलेल्या गोंद कतीराचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. आपल्यापैकी असे काही लोकं आहेत जी गोंद कतीरा सेवन करतात पण त्यांना त्याबद्दल काही गोष्टी माहित नसतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला गोंद कतीराशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

उन्हाळा येताच, लोक शरीर थंड ठेवण्यासाठी थंड पदार्थ खातात आणि पितात, त्यापैकी एक म्हणजे गोंद कतीरा. गोंद कतीरा हा एक नैसर्गिक उपाय आहे जो शरीराला आतून थंडावा देतोच पण त्याचबरोबर अनेक आरोग्य फायदे देखील शरीराला होतात. गोंद कतीरा भारतात शतकानुशतके वापरला जात आहे. हा एक प्रकारचा नैसर्गिक डिंक आहे जो विशेषतः उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानला जातो.
आपल्यपैकी बहुतेक लोकं ते सेवन करतात, तरीही त्यांना त्याचे खरे फायदे, त्याचा वापर आणि सेवनाची योग्य पद्धत माहित नसते. तर आज या लेखात आपण जाणून घेऊया की गोंद कतीरा म्हणजे काय, ते कसे वापरावे आणि उन्हाळ्यात ते शरीराला कसे थंड करते.
गोंद कतीरा म्हणजे काय?
गोंद कतीरा हा एक डिंकाचा प्रकार आहे. ज्याला ट्रॅगाकांथ गम म्हणून ओळखले जाते. हे ॲस्ट्रॅगॅलस वनस्पतीच्या एका प्रजातीच्या रसापासून मिळालेले औषध आहे. गंधहीन व चवहीन असलेला हा पदार्थ शतकानुशतके आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो. गोंद कतीरा हा पाण्यात भिजवल्यावर हा डिंकाच्या जेलीसारखा पदार्थात रूपातंर होतो. स्वयपांक घरात अनेक पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो.
उन्हाळ्यात शरीर कसे थंड होते?
गोंद कतीराचा प्रभाव खूप थंड असतो. हे शरीरातील उष्णता संतुलित करते आणि उष्माघातापासून संरक्षण करते. तसेच याचे सेवन तुम्हाला डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते आणि पोट थंड ठेवते. उन्हाळ्यात, दररोज सकाळी ते भिजवून पाण्यात किंवा सरबतमध्ये मिसळून पिणे खूप फायदेशीर आहे.
गोंद कतीराचे आरोग्य फायदे
1. डिहायड्रेशन रोखते- उन्हाळ्यात घामाच्या स्वरूपात शरीरातून पाणी बाहेर पडत राहते, ज्यामुळे अशक्तपणा येतो. गोंद कतीरा शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते.
2. पचनसंस्था सुधारते -गोंद कतीरामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. हे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे पोट स्वच्छ राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
3. त्वचेला मॉइश्चरायझेशन देते- गोंद कतीरा त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि उन्हाळ्यात कोरडेपणा आणि मुरुम येण्यापासून रोखते.
4. महिलांसाठी फायदेशीर- गोंद कतीरा हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते आणि मासिक पाळीशी संबंधित समस्यांमध्ये देखील आराम देते. या कारणास्तव महिलांनी ते नक्कीच सेवन करावे.
गोंद कतीरा कसा प्यावा
एक चमचा गोंद कतीरा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते फुगून जेलसारखे होईल. तुम्ही ते गाळून सरबत, दूध, लिंबूपाणी किंवा सत्तूमध्ये मिसळून पिऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही गुलाबजल आणि थोडी साखर घालून एक आरोग्यदायी पेय बनवू शकता.
गोंद कतीरा आणि डिंक यात किती फरक आहे?
गोंद कतीरा हा थंडावा देणारा डिंक आहे जो विशेषतः उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी वापरला जातो. पाण्यात भिजवल्यावर ते फुगतात आणि जेलीसारखे पोत धारण करतात आणि हा गोंद कतीरा तुम्ही सरबत, सत्तू किंवा दुधासोबत सेवन केले जाते. हे शरीराला थंड करण्यास, पचन सुधारण्यास आणि डिहायड्रेशन रोखण्यास मदत करते. दुसरीकडे, डिंक हिवाळ्यात जास्त वापरल्या जातात. हे लाडू, खीर, हलवा यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी वापरले जातात. जेणेकरून शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळू शकेल. हे हाडे मजबूत करते आणि अशक्तपणापासून आराम देते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)