AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालना लोकसभा : 20 वर्षांपासून खासदार, पण दानवेंविरोधात नाराजी कायम

जालना : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. जालना लोकसभेविषयी बोलावयाचं झाल्यास यावेळच्या निवडणुकीत जालन्यातील चित्र वेगळंच असू शकतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे गेल्या 20 वर्षांपासून लोकसभा सदस्य आहेत. त्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाचा मिळून तिसरा उमेदवार रिंगणात […]

जालना लोकसभा : 20 वर्षांपासून खासदार, पण दानवेंविरोधात नाराजी कायम
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

जालना : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. जालना लोकसभेविषयी बोलावयाचं झाल्यास यावेळच्या निवडणुकीत जालन्यातील चित्र वेगळंच असू शकतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे गेल्या 20 वर्षांपासून लोकसभा सदस्य आहेत. त्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाचा मिळून तिसरा उमेदवार रिंगणात असण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

जालना जिल्ह्यात स्पर्धात्मक राजकारण सुरु झालेले आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर हे पक्षाने सांगितल्यास लोकसभा लढविणार आहेत. त्या दृष्टीने लोकसभा मतदारसंघात त्यांचे दौरे चालू आहेत. काँग्रेसने तिकीट दिल्यास भीमराव [आबा] डोंगरे निवडणूक लढविण्यास तयार आहेत. तर अचलपूरचे आमदार बच्चू कडूही जालना लोकसभा निवडणूक लढवतील असा कयास आहे. तसे झाले तर खासदार रावसाहेब दानवे यांना लोकसभेची निवडणूक कठीण जाईल यात वाद नाही. कारण, बच्चू कडू म्हणजे शेतकऱ्यांचे हितसंबधाची काळजी घेणारा नेता आहे. त्यामुळे ग्रामीण भाग बच्चू कडूंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

स्टील सिटी आणि सीड सिटी अशी ओळख असलेल्या जालना जिल्ह्याचं महत्त्व सध्या राज्याच्या राजकारणात वाढलेलं आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर भाजपचे परतुरचे आमदार बबनराव लोणीकर हे स्वच्छता आणि पाणीपुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. भाजपला जिल्ह्यात मोठी पदे मिळाल्याने शिवसेनेनेही अर्जुन खोतकर यांना वस्त्रोद्योगराज्यमंत्री पद देऊन या जिल्ह्यात भाजपला आव्हान दिलंय.

जालना जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास आणि सद्यस्थिती

स्टील उत्पादन आणि विविध पिकांचं बियाणे तयार करणारं शहर म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. जालना शहरात बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळई निर्मितीचे कारखाने असल्याने शहराला स्टील सिटी आणि सीड सिटी असंही म्हटलं जातं. सध्या जालना लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व भाजपचे खासदार रावसाहेब दानवे करतायत. दानवे यांची ही चौथी टर्म आहे. 1999 पासून सलग चार वेळा निवडून येण्याचा मान दानवे यांच्या नावावर आहे. त्याआधी 1990 ते 1999 पर्यंत दानवे यांनी सलग दोन वेळा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून एकूण सात उमेदवार रिंगणात होते. पण देशभरात मोदी लाट असल्याने दानवे यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन करत लोकांची मनधरणी केली. या निवडणुकीत दानवे यांना 5 लाख 91 हजार 428 तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांना 3 लाख 84 हजार 630 मते मिळाली. त्यामुळे मोदी लाटेवर साहजिकच दानवे यांना 2 लाख 6 हजार 798 मतांनी विजय मिळवता आला.

स्थानिक राजकारणाचं चित्र

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेहमीच औरंगाबाद जिल्ह्यातला उमेदवार देत असल्याने काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुशीचा फायदा देखील दानवे यांना झाल्याचं बोललं जातं. जालना लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकरदन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, फुलंब्री आणि औरंगाबाद शहरातील सिडको भागाचा समावेश आहे. 2014 नंतर गेल्या चार वर्षात मतदारसंघात बराच बदल झालाय. शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याने जालना जिल्हा परिषदेत अध्यक्ष शिवसेनेचा आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा निवडून आलाय. जालना पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. शिवाय ग्रामीण  आणि शहरी भागातील काँग्रेसचं वर्चस्व अजूनही कायम आहे.

जालना मतदारसंघातील सोयगाव, फुलंब्री, अंबड, बदनापूर या नगरपालिका आणि नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. तर भोकरदन, जालना, सिल्लोड पालिका काँग्रेसच्या ताब्यात आहेत. विधानसभा निवडणुकीत बदनापूरमधून नारायण कुचे, भोकरदनमधून संतोष दानवे, फुलंब्रीतुन हरिभाऊ बागडे हे भाजपचे तीन आमदार विजयी झाले. तर जालना आणि पैठणमधून अनुक्रमे शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि संदिपान भुमरे यांनी विजय मिळवला. सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चार उमेदवारांना 2 लाख 98 हजार 518 मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवारांना 2 लाख 10 हजार 503 मते मिळाली.

दानवेंसमोर एक ना अनेक आव्हाने

जालना लोकसभा मतदारसंघात शेतकरी आणि कष्टकरी मतदारांचा भरणा आहे. शिवाय शहरी भागात दलित, मुस्लीम मतदारांची मोठी असलेली संख्या आणि शेतकऱ्यांचा उमेदवारांच्या बाजूने असलेला कल यावरच या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या उमेदवारांचा निकाल ठरतो. गेल्यावेळी दानवे यांना शिवसेनेने मदत केली, पण यावेळी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने दानवे यांच्यासमोर काँग्रेस, शिवसेना यांचंही आव्हान आहे. शिवाय या मतदारसंघातून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही दानवे यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी कार्यकर्ते आणि मतदार यांच्याशी भेटी गाठी घेऊन चाचपणी सुरू केली आहे.

गेल्या 40 वर्षांपासून अपवाद वगळता सातत्त्याने भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेला जालना लोकसभा मतदार संघ गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बऱ्यापैकी ढासळण्यास सुरुवात झाली होती, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे जालन्याची जागा भाजपाला राखता आली. मात्र गेल्या चार वर्षातील सरकारचा कारभार, फोल ठरलेली घोषणाबाजी, रावसाहेब दानवे यांच्याविषयी जनतेचा नव्हे, तर त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास, शिवाय यावेळी नसलेली मोदी लाट अशा विविध कारणांमुळे रावसाहेब दानवे यांना अनेक अडचणी आणि कडव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील आमदार

जालना मतदारसंघ : अर्जुन खोतकर, शिवसेना

बदनापूर : नारायण कुचे, भाजप

पैठण : संदिपान भुमरे, शिवसेना

भोकरदन : संतोष दानवे, भाजप

सिल्लोड : अब्दुल सत्तार, काँग्रेस

फुलंब्री : हरीभाऊ बागडे, भाजप

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.