शरद पवार आणि माढ्याचं नातं काय?

मुंबई : राष्ट्रावादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषमंत्री शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारंसघातून शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. माढा मतदारसंघ तसा शरद पवारांसाठी नवीन नाही. 2009 साली शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवली होती आणि जिंकलेही होते. त्यामुळे माढा आणि शरद […]

शरद पवार आणि माढ्याचं नातं काय?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : राष्ट्रावादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषमंत्री शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारंसघातून शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. माढा मतदारसंघ तसा शरद पवारांसाठी नवीन नाही. 2009 साली शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवली होती आणि जिंकलेही होते. त्यामुळे माढा आणि शरद पवार यांचे नाते तसे जवळचे आहे. मात्र, त्या पलिकडे शरद पवार यांची राजकीय वाटचाल आणि माढा लोकसभा मतदारसंघाची सद्यस्थिती थोडक्यात जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. जेणेकरुन माढ्यातून शरद पवारांनी लढणं किती महत्त्वाचं आणि किती आव्हानात्मक आहे, हे आपल्या लक्षात येईल.

2009 साली माढ्यातून पवारांचा विजय

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली व विजयी झाले होते. त्या निवडणुकीत शरद पवारांनी भाजपचे सुभाष देशमुख आणि रासपचे महादेव जानकर यांना पराभूत केले होते.

  • शरद पवार (राष्ट्रवादी) – 5 लाख 30 हजार 596 मतं
  • सुभाष देशमुख (भाजप) – 2 लाख 16 हजार 137 मतं
  • महादेव जानकर (रासप) – 98 हजार 946 मतं

हेही वाचा – पवारांच्या नुसत्या नावाची चर्चा, माढ्यातल्या नाराजांची फौज मुंबईत!

मोदीलाटेतही राष्ट्रवादीचं वर्चस्व

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली.

  • विजयसिंह मोहिते पाटील – 4 लाख 89 हजार 989 मतं
  • सदाभाऊ खोत – 4 लाख 64 हजार 645 मतं
  • स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील – 25 हजाराहून अधिक मतं

माढा मतदारसंघाची रचना कशी आहे?

मतदारसंघ सोलापूर व सातारा जिल्ह्यात विभागला गेला आहे. एकूण सहा विधानसभा मतदारसंघ यात येत असून चार सोलापूर तर दोन सातारा जिल्ह्यातील आहेत. येथील मतदारसंख्या ही 2014 च्या निवडणुकीत 15 लाख 58 हजार इतकी होती यात आता वाढ होवून ती 16 लाखाच्या पुढे गेली आहे. यात 52 टक्के पुरुष तर 48 टक्के महिला मतदार आहे.

माढा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसी विचारसरणीचा असून यास साखरपट्टा म्हणून ओळखले जातो. यात साखर कारखाने ही जास्त आहेत आणि दुष्काळी पट्टा ही मोठा आहे.

विधानसभा मतदारसंघांवर दोन्ही काँग्रेसचं वर्चस्व

या मतदारसंघावर दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व आहे. करमाळ्याला शिवसेनेचे नारायण पाटील हे आमदार आहे तर माढा, माळशिरस व फलटणमध्ये  राष्ट्रवादीचे उमेवार विजयी झाले होते. माढ्याचे प्रतिनिधीत्व आमदार बबनराव शिंदे करत आहेत तर माळशिरसला हनुमंत डोळस व फलटणला दीपक चव्हाण विधानसभा सदस्य आहेत. सांगोल्यात दोन्ही काँग्रेसचा मित्रपक्ष असणारे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख आहेत. सातारा जिल्ह्यातील माण मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. येथून जयकुमार गोरे हे विजयी झाले होते.

माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा व विद्यमान आमदार :

  • करमाळा (सोलापूर) – नारायण पाटील (शिवसेना)
  • माढा (सोलापूर) – बबनराव शिंदे (राष्ट्रवादी)
  • माळशिरस (सोलापूर) – हनुमंत डोळस (राष्ट्रवादी)
  • सांगोला (सोलापूर) – गणपतराव देशमुख (शेकाप)
  • माण (सातारा) – जयकुमार गोरे (काँग्रेस)
  • फलटण (सातारा) – दीपक चव्हाण (शेकाप)

पवारांच्या उमेदवारीमुळे कोण नाराज?

शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे अर्थात पहिला फटका विद्यमान खासदार विजयसिंह मोहित पाटील यांना बसणार आहे. कारण त्यांना पुन्हा तिकीट मिळणार नाही. मात्र, विजयसिंह मोहित पाटलांना राज्यसभेवर, तर त्यांचा मुलगा रणजिंसह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवून काढली जाणार आहे. शिवाय, प्रभाकर देशमुख आणि बबन शिंदे हेही माढ्यातून लढण्यास इच्छुक होते. मात्र, या सगळ्यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादीला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघ नवा नाही. त्यांनी तेथून निवडणूक लढवून जिंकलीही आहे. शिवाय, कृषी क्षेत्रात उत्तम जाण असलेल्या पवारांना माढ्यासारख्या शेतीपट्ट्यातील समस्यांचीही चांगली जाण आहे. त्यामुळे ते माढ्यातून जिंकण्याच्या आशाही अधिक वाढल्या आहेत.

VIDEO : शरद पवारांच्या घरी राहुल गांधी, ‘युनायटेड इंडिया’ आघाडी लागली कामाला

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.