पवारांच्या नुसत्या नावाची चर्चा, माढ्यातल्या नाराजांची फौज मुंबईत!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा झाल्या आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. माढ्यात सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्याने, त्यांचा पत्ता कट होणार का, इथपासून ते पवार पुन्हा खरंच माढ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार का, इथवर चर्चा सुरु झाल्या. मात्र, आता […]

पवारांच्या नुसत्या नावाची चर्चा, माढ्यातल्या नाराजांची फौज मुंबईत!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा झाल्या आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. माढ्यात सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्याने, त्यांचा पत्ता कट होणार का, इथपासून ते पवार पुन्हा खरंच माढ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार का, इथवर चर्चा सुरु झाल्या. मात्र, आता पवार माढ्यातून उतरणार असल्याच्या चर्चांना काहीसा दुजोरा देणारी घटना घडलीय. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासादार आणि इतर इच्छुक उमेदवारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे.

मुंबईतल्या बैठकीत काय होईल?

सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद संपवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत आज (13 फेब्रुवारी) संध्याकाळी बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला राष्ट्रवादीचे माढ्यातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, प्रभाकर देशमुख आणि बबन शिंदे उपस्थित राहणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्याआधीच माढ्यातील राष्ट्रवादीचे अंतर्गत वाद मिटवण्याची धडपड पक्षाच्या वरिष्ठांकडून केली जात आहे.

माढ्यातून लढण्याबाबत शरद पवार काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार की याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. स्वत: शरद पवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र शरद पवार यांनी आज केलेलं वक्तव्य संभ्रमात टाकणारं आहे. आजच्या वक्तव्यामुळे शरद पवार पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. खुद्द शरद पवार यांनीच ही माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, “माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली. माझी इच्छा नाही, पण विचार करु”

शरद पवार यांनी एकीकडे इच्छा नाही असं म्हटलं आहे, तर दुसरीकडे विचार करु असंही म्हटल्याने पवार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. दुसरीकडे अजित पवारांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात लढण्याची गरज नाही, माझ्याकडे 5-6 प्रबळ दावेदार आहेत, असं शरद पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अजित पवारांना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.

संबंधित बातम्या :

माढ्यातून शरद पवार उतरल्यास काय होईल?

लोकसभा लढण्याबाबत दोन दिवसात निर्णय, शरद पवारांची घोषणा

शरद पवार माढा लोकसभा निवडणूक लढवणार?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.