AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramtek Lok sabha result 2019 : रामटेक लोकसभा मतदारसंघ निकाल

रामटेक : रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांनी बाजी मारली आहे. रामटेक मतदार संघात देशातील पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिल रोजी मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 62.12 टक्के इतकं मतदान पार पडलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झालं. 2014 च्या निवडणुकांमध्ये 62.70 टक्के मतदान झालं होतं. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाणे […]

Ramtek Lok sabha result 2019 : रामटेक लोकसभा मतदारसंघ निकाल
रामटेक : कृपाल तुमाणे
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

रामटेक : रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांनी बाजी मारली आहे. रामटेक मतदार संघात देशातील पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिल रोजी मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 62.12 टक्के इतकं मतदान पार पडलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झालं. 2014 च्या निवडणुकांमध्ये 62.70 टक्के मतदान झालं होतं. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात लढत होती.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाकृपाल तुमाणे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीकिशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरकिरण रोडगे-पाटनकर (VBA)पराभूत

रामटेक मतदार संघात यंदाची निवडणूक ही शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक शिगेला पोहोचलेली होती. यंदाच्या लोकसभेसाठी शिवसेनेकडून कृपाल तुमाणे तर काँग्रेसकडून किशोर गजभिये निवडणुकीच्या रिंगणात होते.

या लढतीला महत्त्व का?

2014 मध्ये रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाणे निवडून आले होते. त्यावेळी त्यांना 5 लाख 9 हजार 892 मतं पडली होती. गेल्या निवडणुकीला काँग्रेसने मुकुल वासनिक यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, ते पराभूत झाले. त्यावेळी यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने किशोर गजभिये यांना संधी दिली.

राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक म्हणजे रामटेकची लढत होती. रामटेक हा नागपूरचा ग्रामीण भाग आहे. कधी काळी रामटेक हा काँग्रेसचा गड असलेला मतदार संघ होता. मात्र, या ठिकाणी शिवसेनेने आपली ताकत वाढवली आणि रामटेकच्या गडावर भगवा फडकवला. त्यामुळे काँग्रेसला आपला मतदार संघ परत मिळवायचा होता. दुसरीकडे शिवसेनेला आपला गड राखायचा होता. यामध्ये शिवसेना यशस्वी ठरली.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी

मतदार संघ                    2014                       2019

काटोल                            64.17%                    64.29%

सावनेर                            65.40%                    62.56%

हिंगणा                            59.56%                     58.42%

उमरेड                           63.70%                     67.15%

कामठी                          58.75%                      58.60%

रामटेक                         65.62%                      64.58%

एकूण टक्केवारी पाहता 2014 च्या तुलनेत मतदानात 0.58 टक्क्यांची घट झाली.

यंदाच्या मतदानाचा विचार केला 2014 च्या तुलनेत 2019 च्या मतदानात तसा फारसा काही फरक पडलेला नाही. मात्र, महत्वाचं म्हणजे तरुण मतदार वर्ग हा या निवडणुकीचं वैशिष्ट्य होतं. यंदाच्या मतदानात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाने सहभाग घेतला. त्यामुळे या तरुण मतदारांचा कल नेमका कुणाकडे असेल, यावर बऱ्याच बाबी अवलंबून होत्या.

यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्ये, कुणा-कुणाच्या सभा झाल्या?

रामटेक मतदार संघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत असल्याने या निवडणुकीला रंगत आली होती. यंदाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रोजगार हे मुद्दे मोठ्या प्रमाणात गाजले. प्रचारात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, तर नागपुरात राहुल गांधी यांनी सभा घेतल्या. तर शिवसेनेच्या प्रचारासाठी स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन सभा घेतल्या. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही रामटेक मतदार संघात दोन सभा घेतल्या. त्याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही तुमाणे यांच्यासाठी प्रचार केला होता.

प्रचारा दरम्यान रामटेक मतदार संघात वेगवेगळे मुद्दे गाजले. राष्ट्रीय तसेच स्थानिक मुद्यांवर ही निवडणूक लढवण्यात आली होती. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मात्र, यंदाही शिवसेनेने रामटेकमध्ये विजय मिळवला आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या