AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर

संगीता चांदगुडे यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचं,  सोशल मीडिया अकाउंट चर्चेत आलं आहे. ‘official_sangita_patil_30’ या नावाने असलेल्या त्यांच्या Instagram अकाउंटवर 107 पोस्ट आहेत.

107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
Sangeeta ChandgudeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 11:21 AM
Share

गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एक दुर्दैवी घटना घडली होती. चांदगुडे कुटुंबातील तीन जणांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. हसतं खेळतं कुटुंब डोळ्यादेखील संपलं. मुलगा कुणाल चांदगुडे, आई संगीता चांदगुडे आणि वडील मुरलीधर चांदगुडे अशी मृतांची नाव आहेत. दरम्यान कौटुंबीक वादातून ही घडना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अजूनपर्यंत तरी कोणतंही अधिकृत कारण समोर आलेलं नाहीये. दरम्यान संगीता चांदगुडे यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचं,  सोशल मीडिया अकाउंट चर्चेत आले आहे.

‘official_sangita_patil_30’ या नावाने असलेल्या Instagram अकाउंटवर 107 पोस्ट असून, या अकाउंटवर मराठी उखाणे आणि वैयक्तिक स्वरूपातील विविध पोस्ट पाहायला मिळतात. या अकाउंटच्या बायोमध्ये ‘मराठी उखाणे’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. तसेच अकाउंटवर लग्न आणि उखाण्यांशी संबंधित अनेक पोस्ट करण्यात आल्याचे दिसून येते. अकाउंटवर 7,891 फॉलोअर्स असून, संगीता पाटील या नावाने हे अकाउंट चालवले जात असल्याचे स्क्रीनशॉटमधून दिसत आहे.

खवड्या डोंगरावरील घटनेनंतर संगीता चांदगुडे यांचे सोशल मीडिया व्हिडिओ आणि पोस्ट समोर आल्याने त्यांच्या सोशल मीडिया वापराबाबतही चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया व्हिडिओंमधून कौटुंबिक परिस्थिती आणि नातेसंबंधांबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना समोर आल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्ट किंवा व्हिडिओंचा खवड्या डोंगरावरील घटनेशी थेट संबंध असल्याचे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणातील नेमके कारण आणि पार्श्वभूमी पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

कौटुंबीक वाद 

दरम्यान गेल्या शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. खवड्या डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवण्याच्या नादात आई-वडिलांचा देखील मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत. कौटुंबीक वादाची पार्श्वभूमी देखील समोर आली आहे. संगीता चांदगुडे यांच्या माहेरच्या लोकांकडून मुरलीधर चांदगुडे यांच्या घरच्यांवर आरोप करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे संगीता चांदगुडे यांच्यामुळे आपला मुलगा आपल्यापासून वीस वर्ष दूर होता, असा आरोप मुरलीधर चांदगुडे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु