AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात सुरु तरी काय? 4 वर्षांच्या चिमुरडीनंतर, 11 वर्षीय मुलीचा वियनभंग, ‘त्या’ काही मिनिटांत नेमकं काय घडलं? पोलिसांची मोठी कारवाई

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मुली असुरक्षित... 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्येनंतर 11 वर्षीय मुलीचा वियनभंग, 'त्या' काही मिनिटांत नेमकं काय घडलं? पोलिसांची मोठी कारवाई

पुण्यात सुरु तरी काय? 4 वर्षांच्या चिमुरडीनंतर, 11 वर्षीय मुलीचा वियनभंग, 'त्या' काही मिनिटांत नेमकं काय घडलं? पोलिसांची मोठी कारवाई
| Updated on: May 03, 2026 | 10:22 AM
Share

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नरसापूर येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 65 वर्षीय विकृताला अटक केली आहे. ही घटना ताजी असताना पुण्यात आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. 11 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी परप्रांतीय नराधमाला अटक केली आहे. सांगायचं झालं तर, पुणे जिल्ह्यात अत्याचार आणि खुनाच्या सलग दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असतानाच, पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याने परप्रांतीयांविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील बिरदवडी येथे अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तर चाकण पोलिसांनी परप्रांतीय 32 वर्षीय आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा याला ताब्यात घेतले आहे.

‘त्या’ काही मिनिटांत नेमकं घडलं तरी काय?

शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडिता घरात कोणी नसल्याने घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. मुलगी एकटी असल्याचं पाहून आरोपीने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र 11 वर्षीय पीडित मुलीने तेथून पळ काढला, ज्यामुळे ती बचावली.

त्यानंतर घडलेली सर्व घटना 11 वर्षीय मुलीने तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशात घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी देखील कठोर कारवाई केली आणि नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी विरुद्ध पोक्सोच्या अंतर्गत उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात चार वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या

65 वर्षांच्या आरोपीने चार वर्षांच्या चिमुरडीला जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह तिथेच लपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी या चिमुरडीला सोबत नेतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीची ही पहिली वेळ नव्हती, यापूर्वी देखील त्याने अनेक महिलांसोबत वाईट वर्तन केलंय. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी