मोठी बातमी! 14 आमदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ? एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक, थेट..
शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदार शिंदेंनी फोडले. त्यानंतर आता आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामध्येच आता तब्बल 14 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाचे 14 आमदार गुप्तपणे शिंदेंना भेटले.

शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबद्दल पत्रही दिले. हा थेट उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. या खासदारांची बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने बैठकीचे व्हिप जारी केले. मात्र, तरीही हे खासदार बैठकीत उपस्थित राहिले नाही. त्यानंतर एकाच या खासदारांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर अशा नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. हा अत्यंत मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसला. एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये जात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षाने अलर्ट जारी केला. आपले खासदार आमदार फुढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
यादरम्यानच आता शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर 3 सक्रिय करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे धुरंदर राजकारण सुरू असल्याचे बघायला मिळतंय. शिवसेना ठाकरे गटातल्या 6 खासदारांचे ॲापरेशन टायगर यशस्वी झाल्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या रडारवर आहेत.
शिवसेना ठाकरे यांच्या गटातील 20 आमदारांपैकी 14 आमदारांनी काल अज्ञातस्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे घेतल्याची मोठी माहिती पुढे येतंय. ज्यामुळे राज्याच्या राजकारणत भूकंप आला. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारानंतर आता ठाकरे गटाचे 14 आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, त्यांची गुप्तपणे बैठकही झाली.
लवकरच ॲापरेशन टायगर 3 चे परिणाम दिसू लागणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल विधिमंडळात याच कारणामुळे गैरहजर होते अशी वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांची माहिती देखील मिळत आहे. 6 खासदारांनंंतर जर शिवसेना ठाकरे गटाचे 14 आमदार फुटले तर हा अत्यंत मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना म्हणावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
