AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांनी भरलेलं दोन विमान अचानक आमनेसामने; अहमदाबाद विमानतळावरच घडली थरारक घटना

ahmedabad airport : अहमदाबाद विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगोचे विमान टॅक्सीवेवर समोरासमोर आली होती.

प्रवाशांनी भरलेलं दोन विमान अचानक आमनेसामने; अहमदाबाद विमानतळावरच घडली थरारक घटना
| Updated on: Jun 26, 2026 | 8:48 AM
Share

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सांयकाळी मोठी दुर्घटना टळली.  एअर इंडिया आणि इंडिगोचे प्रवासी विमान अचानक आमनेसामने आले. या घटनेने विमानतळावर एकच खळबळ उडाली. दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमान काही अंतरावर थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने तातडीने चौकशी सुरू केली आहे.

नेमकं काय घडलं?

नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सीवेवरील चुकीच्या निर्देशामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईहून अहमदाबादला जाणारे एअर इंडियाचं विमान हे धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरल्यानंतर पार्किंगच्या दिशेने जात होते. त्याचवेळी हवाई वाहतूक यंत्रणेने विमानाला टॅक्सीवे ‘सी’ वरून टॅक्सीवे ‘जी’वर जाण्याचे निर्देश दिले. परंतु एअर इंडियाच्या वैमानिकाने उजवीकडे वळण्याऐवजी विमान सरळ टॅक्सीवे ‘पी’ मार्गावर नेलं. यामुळे संपूर्ण घटना घडली.

एअर इंडियाचं विमान चुकून टॅक्सीवे ‘पी’ या मार्गावर गेलं. त्याचवेळी इंडिगोचं विमान हे अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी टॅक्सीवे ‘पी’वरून धावपट्टीवर येत होते. त्यावेळी तातडीने एअर इंडिया विमानाच्या वैमानिकाला चूक लक्षात आली. त्याने तातडीने विमान जागेवरच थांबवलं. यामुळे दोन्ही विमान एकमेकांसमोर येऊन थांबली. त्यानंतर एअर इंडियाचं विमान ‘टो’ करत पार्किंगमध्ये आणलं. यामुळे इंडिगोच्या विमानाला मुंबईच्या दिशेने उड्डाण करण्यास उशीर झाला.

तत्पूर्वी, या घटनेत कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. मात्र, त्यानंतरही नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. एअर इंडियाचं विमान नियोजित मार्गावरून न जाता चुकीच्या दिेशेने का गेले, यात नेमकी कुणाची चूक होती, याची माहिती चौकशीतून समोर येईल.

अहमदाबाद विमानतळावरील टॅक्सीवेवर दोन विमानांची धडक होता हाता वाचली, ते दोन्ही विमान एअरबस ए320 कॅटेगरीच्या ‘नॅरो बॉडी’ विमान होते. या प्रकारच्या विमानात जवळपास १५० ते १८० प्रवासी बसू शकतात. या घटनेवेळी दोन्ही विमानात एकूण किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात