AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवीच्या विद्यार्थ्यानं डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं, सोलापुरात खळबळ

सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं डोक्यात गोळी घालून आपलं आयुष्य संपवलं आहे.

आठवीच्या विद्यार्थ्यानं डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं, सोलापुरात खळबळ
| Updated on: Jan 27, 2025 | 5:36 PM
Share

सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे.  आठवीत शिकणाऱ्या एका मुलानं बंदुकीने आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे.  सोलापूरच्या माढ्यातील आढेगावमध्ये ही घटना घडली आहे.  श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या या 14 वर्षांच्या मुलाचं नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान श्रीधरने नेमकी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

श्रीधरकडे बंदूक कशी आली? 

श्रीधर गणेश नष्टे हा माढ्यातील आढेगावचा रहिवासी आहे, तो आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याने बंदुकीची गोळी डोक्यात झाडून आत्महत्या केली आहे. त्याचे वडील गणेश नष्टे हे सिमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. त्यांचीच ही बंदूक आहे. या बंदुकीचं लायन्सस जम्मू काश्मीरचं आहे. त्याने आपल्या वडिलांची बंदूक घेतली. शांतपणे खुर्चीवर बसला आणि काही कळायच्या आतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. या घटनेनं नष्टे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र त्याने टोकाचं पाऊल का उचलंल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबईत देखील असाच एक प्रकार घडला आहे. मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराच्या मुलानं आत्महत्या केली. हर्ष म्हस्के असे या 20 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे, त्याने आपल्या वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.  या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मात्र हर्ष याने आत्महत्या का केली? याच कारण अद्याप समोर आलेलं नाही. ही घटना ताजी असतानाच आता सोलापूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीधर गणेश नष्टे या मुलानं आत्महत्या केली आहे, मात्र त्याच्याही आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?