अमेरिकेतून काही दिवसापूर्वीच कल्याणमध्ये, 11 वीतील विद्यार्थी 17 व्या मजल्यावरुन कोसळला

खडकपाड्यात हाई प्रोफाइल स्प्रिंग सीजन कॉम्प्लेक्समध्ये राहणारे मंगेश गोळे यांचा 16 वर्षीय मुलगा अचानक 17 व्या मजल्यावरुन पडून मृत्यूमुखी पडला (16 year old boy dies after falling from 17th floor in Kalyan).

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 21:45 PM, 28 Oct 2020

ठाणे : कल्याणच्या खडकपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकपाड्यात हाई प्रोफाइल सीजन स्प्रिंग कॉम्प्लेक्समध्ये राहणारे मंगेश गोळे यांचा 16 वर्षीय मुलगा अचानक 17 व्या मजल्यावरुन पडून मृत्यूमुखी पडला. ही घटना संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली (16 year old boy dies after falling from 17th floor in Kalyan).

मंगेश गोळे हे अमेरिकेत एका कंपनीत कामाला होते. त्यांचा मुलगा प्रथमेश याचं दहावीपर्यंतचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे. लॉकडाऊनमुळे गोळे कुटुंब कल्याणमध्ये राहायला आलं. प्रथमेशने कल्याणच्या एका कॉलेजमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला होता, अशी माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय अशोक पवार यांनी दिली.

दुर्घटना घडली तेव्हा घरात इतर कुटुंबीयदेखील हजर होते. पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात मृत मुलाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे (16 year old boy dies after falling from 17th floor in Kalyan).

दरम्यान, प्रथमेशने आत्महत्या केली की अपघातामुळे त्याचा मृत्यू झाला, याचा तपास सुरु आहे. मात्र कल्याणच्या एका हाय प्रोफाइल कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.