Malegaon हिंसाचारातील 18 संशयितांना बेड्या, 41 जणांवर 5 गुन्हे दाखल

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून मालेगावमध्ये दंगल माजवून थेट पोलिसांना लक्ष्य करणाऱ्या 18 संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एकूण 41 जणांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Malegaon हिंसाचारातील 18 संशयितांना बेड्या, 41 जणांवर 5 गुन्हे दाखल
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 10:27 AM

नाशिकः त्रिपुरा येथील कथित घटनेवरून दंगल माजवून थेट पोलिसांना लक्ष्य करणाऱ्या 18 संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एकूण 41 जणांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मालेगावमध्ये पुकारलेल्या बंदमध्ये तब्बल पाचशे जणांचा जमाव अचानक आक्रमक बनला. त्यातील काही जणांनी जुना आग्रा रोड, बसस्थानक, किदवाई रोडवर हैदोस घातला. हॉटेल, दुकाने, घरांवर दगडफेक केली. पोलिसांची वाहने फोडली. अपर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी, शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संशयितांनी प्रचंड दगडफेक केली. जवळपास अडीच तास ही अराजकसृश्य परिस्थिती होती. त्यात जणांनी थेट पोलीस उपअधीक्षक दोंदे यांच्या सुरक्षारक्षकावर कटरने हल्ला केला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस नाईक सूर्यवंशी यांच्यावर बेछूट दगडफेक करत प्राणघातक हल्ला केला. या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी, सात जवान जखमी झाले. आता पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे.

धार्मिक नेत्यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली

मालेगावमध्ये पुकारलेल्या बंदला लागलेले हिंसक वळण कटाचा भाग आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यात काही धार्मिक नेत्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 18 संशियतांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्हीचा आधार घेत संशयितांचा कसून शोध सुरू आहे. त्यात जवळपास 41 जण कैद झाले असून, त्यांच्यावर विविध प्रकारचे पाच गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. उर्वरित संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे.

बंदोबस्त वाढवला

मालेगाव पेटल्याने त्याचे पडसाद इतर ठिकाणी उमटले. त्यामुळे येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, मालेगावमधील दंगल रोखण्यात आतापर्यंत पोलीस अपयशी ठरल्याचा इतिहास आहे. आता तरी दंगेखोरांना शोधून काढून कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केली आहे. तर मंत्री छगन भुजबळ आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखा असे आवाहन केले आहे. (18 suspects in Malegaon violence arrested, 5 cases registered against 41)

इतर बातम्याः

VIDEO | ओव्हरटेक केल्याचा राग, नाशकात बसमध्ये घुसून महिलेची साथीदारांसह कंडक्टर-ड्रायव्हरला मारहाण

VIDEO: 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात; चंद्रकांत पाटलांनी आकडेवारीच दिली

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.