AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात; चंद्रकांत पाटलांनी आकडेवारीच दिली

राज्यातील सर्वच मुसलमान वाईट आहेत असं नाही. 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक आहेत. तर 5 टक्के मुस्लिम गडबड करतात.

VIDEO: 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात; चंद्रकांत पाटलांनी आकडेवारीच दिली
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 7:33 PM
Share

नाशिक: राज्यातील सर्वच मुसलमान वाईट आहेत असं नाही. 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक आहेत. तर 5 टक्के मुस्लिम गडबड करतात, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

अमरावती, भिवंडी, नांदेड, परभणी, मालेगावमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. तुम्हाला राज्य करायचं असेल तर करा. मुस्लिमांची मतेही मिळवा. कोण नाही म्हणतंय. राज्यात 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक आहेत. तर 5 टक्के मुस्लिम गडबड करतात. 5 टक्के मुस्लिम गडबड करतात, त्यावर तुम्ही टीका पण नाही करणार का?, असा सवाल करतानाच मालेगाव, नांदेडमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीसारखी टीका करा, असं पाटील म्हणाले.

मग भाजपचा हात कापून काढा

तुम्हाला झोपताना उठताना बीजेपी दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरू केला, आरोग्य पेपर आम्हीच फोडले, शेतकरी पैसे आम्ही थांबवले… अरे चाललंय काय? काय चेष्टा चालली आहे. तुम्ही काय करत आहात हे सामान्य माणसाला कळत नाही काय? सगळीकडे भाजपचा हात आहे असं म्हणतात. मग तुम्ही 3 पक्ष समर्थ आहात ना? भाजपचा हात कापून काढा ना. तुम्हाला कोणी अडवलं. तुम्ही तिघेही दुबळे, आम्ही श्रेष्ठ. सरकारने थांबवण्याचा प्रयत्न केला तर पदं जातील, अशी टीका त्यांनी केली. आज यांचा एक माजी गृहमंत्री तुरुंगात आहे. एक गृहमंत्री आताच आजारपणातून बाहेर पडले. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहे. बाहेरून चालवणारे मात्र आहेत ना?, असा टोलाही त्यांनी लगावला.

म्हणून हिंमत झाली

चूक झाली तर सांगा, पण सारखं सरकार बदलू नका. त्रिपुरात कथित अनुचित प्रकार घडला. मात्र, दंगल मालेगाव आणि अमरावतीमध्ये झाली. इतकी वर्ष हिम्मत झाली नाही का. इतकी हिम्मत होते, कारण पोलीस कारवाई करत नाहीत. पोलिसांनी दंडुका उगारला, तर त्यांची मते जातील. अमरावतीत खुले आम दंगल झाली. माजी मंत्र्यांचे ऑफिस फोडले, पण कारवाई कोण करेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पोलिसांनी प्रामाणिकपणे अहवाल द्यावा

त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत ही परंपराच आहे. निषेध नोंदवायचा तर शांततेने नोंदवा ना. अमरावतीचा कालचा रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा. माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचे ऑफिस फोडले गेले नाही? सामान्य माणसाचे ऑफिस फोडले गेले नाही? आज बंद वर पोलीस लाठ्या चालवतील. काल ज्यांनी दुकान फोडले त्यांच्यावर लाठ्या नाही चालवल्या, असा आरोपही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

डॉ. अशोक पाल हत्येनंतर विद्यार्थी आक्रमक, कॉलेज ट्रान्सफरसाठी निवेदन, डीनवर आर्थिक शोषणाचे आरोप

कंगना रणावत विरोधात मुंबईत तक्रार दाखल, काँग्रेस नेत्याकडून अटकेची मागणी

भाजप-मनसे युतीबाबत नाशिकमध्ये मंत्री दानवेंचे सूचक वक्तव्य; राज्यातल्या हिंसाचारामागे मोठी शक्ती असल्याचा दावा

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.