VIDEO | ओव्हरटेक केल्याचा राग, नाशकात बसमध्ये घुसून महिलेची साथीदारांसह कंडक्टर-ड्रायव्हरला मारहाण

नाशकात मारहाणीचा एक व्हिडीओ पुढे आला आहे. यामध्ये नाशकातील सिटी बसमध्ये घुसून एक महिला तिच्या साथीदारांसह मिळून कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. नाशकात एक सिटी बस बोरगडवरुन नाशिककडे येत असताना हा प्रकार घडला.

VIDEO | ओव्हरटेक केल्याचा राग, नाशकात बसमध्ये घुसून महिलेची साथीदारांसह कंडक्टर-ड्रायव्हरला मारहाण
Nashik bus driver beaten

नाशिक : नाशकात मारहाणीचा एक व्हिडीओ पुढे आला आहे. यामध्ये नाशकातील सिटी बसमध्ये घुसून एक महिला तिच्या साथीदारांसह मिळून कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. नाशकात एक सिटी बस बोरगडवरुन नाशिककडे येत असताना हा प्रकार घडला.

ओव्हरटेक केल्याच्या कारणावरुन मारहाण

गाडीला ओव्हरटेक का केलं याचा जाब विचारत महिला आणि तिचे साथीदार बसमध्ये घुसल्याची तक्रार ड्रायव्हर आणि कंडक्टरने केलीये. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

याप्रकरणी नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात महिला आणि साथीदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, सिटी लिंक बस कंपनीकडून देखील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा गंभीर दखल घेण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ –

पुण्यात पोलिसाला लाथाबुक्क्याने मारहाण

पिंपरी चिंचवडमध्ये एका साध्या वेशात गस्त घालत असेलल्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एकाने जमिनीवर पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद लक्ष्मण ढिल्लोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर हे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचमध्ये कार्यरत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ते साध्या वेशात देहूरोड बाजार येथे गस्त घालत असताना ही घटना घडली. आरोपी अरविंद ढिल्लोड हा बालाजी लंच हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल घ्यायला आला होता. जेवण पार्सल मिळण्यास विलंब होत असताना महिला लंचहोम चालक यांना आरोपी ग्राहक अर्वाच्य भाषेत बोलत होता. यावेळी पोलीस ज्ञानेश्वर गाडेकर हे त्याठिकाणी उभे होते. त्यांनी आरोपी अरविंद याला महिलेशी चांगल्या भाषेत बोल असे सांगताच आरोपी अरविंदने पोलिसांच्या कानशिलात लगावून दिली. या मारहाणीची घटना लंच होममधील सीसीटीव्ही कॅमऱ्यामध्ये कैद झाली आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरीत क्रिकेट मॅचच्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातली बॅट ; दोघांवर गुन्हा दाखल

दापोडीतील कब्रस्थानात गप्पा मारत बसलेले प्रेमीयुगल अन … घडला हा धक्कादायक प्रकार

Published On - 9:31 am, Sun, 14 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI