AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे, अजितदादा अडचणीत, मतदानाला काही तास बाकी असतानाच मोठा झटका

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, याचदरम्यान मोठी बातमी समोर आली असून, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे, अजितदादा अडचणीत, मतदानाला काही तास बाकी असतानाच मोठा झटका
एकनाथ शिंदे, अजित पवार Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 01, 2025 | 5:40 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर बुधवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज या निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आणि प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार निवडणूक प्रचार काळात अनेक नेत्यांकडून मतदारांना आर्थिक प्रलोभणं दाखवणारी वक्तव्य करण्यात आली आहेत, अशा वक्तव्याची आता निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अशा नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शिरसाठ, मंत्री जयकुमार गोरे, भाजप नेत्या चित्र वाघ यांचा समावेश आहे, आता या नेत्यांना मतदारांना आर्थिक प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत प्रलोभने देणाऱ्या २० नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे.  राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहेत, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ अहवाल मागवला आहे.

अजित पवार यांच्याकडून निधीला कात्री लावण्याचं वक्तव्य करण्यात आलं होतं. तुमच्याकडे मत तर माझ्याकडे निधी अशा अशयाचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. तर  गुलाबराव पाटील यांनी लक्ष्मी दर्शन होणार अशा अशयाचं वक्तव्य केलं होतं.  तर एकनाथ शिंदे यांनी तिजोरीच्या चाव्या संदर्भात विधान केलं होतं. तर  खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण  असं विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केल होतं. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार अशा वीस नेत्यांच्या नावाची यादी आता निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आली आहे.  जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल देखील मागवण्यात आला आहे, त्यामुळे या नेत्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यात आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्याच्या घरी छाप्या प्रकरणी निलेश राणे यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा