AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महादेवाची पिंड आणण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, जळगावजवळ भीषण अपघातात तिघे मृत्यमुखी

जळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या बांभोरी गावाजवळ ट्रक आणि क्रुझरची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चौघे जण हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे मृतांपैकी काही जण हे ओंकारेश्वर येथे महादेवाची पिंड घेण्यासाठी जाणारे भाविक होते.

महादेवाची पिंड आणण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, जळगावजवळ भीषण अपघातात तिघे मृत्यमुखी
| Updated on: Mar 15, 2024 | 10:44 AM
Share

जळगाव | 15 मार्च 2024 : जळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या बांभोरी गावाजवळ ट्रक आणि क्रुझरची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चौघे जण हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांपैकी काही जण हे ओंकारेश्वर येथे महादेवाची पिंड घेण्यासाठी जाणारे भाविक होते. मात्र ती पिंड आणण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी गावाजवळ वाळूचा ट्रक आणि क्रूझर यांची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी काही जण ओंकारेश्वर येथे महादेवाची पिंड घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांपैकी होते. मात्र त्यांचा अकाली मृत्यू झाला. तुषार जाधव, विजय हिंमतराव चौधरी आणि भूषण सुभाष खंबायत अशी मृतांची नावे असून ते तिघेही जळगावमधील रहिवासी आहेत. तर इतर चौघे जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली असून मोठी गर्दी जमलेली आहे. दरम्यान अपघातग्रस्त ट्रक हा अवैधपणे वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?