AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरच्या मेडिकल कॉलेजलाच कोरोनाचा विळखा; 30 डॉक्टर्स, तीन नर्स कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. (30 Doctors, 3 Nurses Among 38 Infected With Coronavirus In nagpur)

नागपूरच्या मेडिकल कॉलेजलाच कोरोनाचा विळखा; 30 डॉक्टर्स, तीन नर्स कोरोना पॉझिटिव्ह
| Updated on: Feb 17, 2021 | 4:37 PM
Share

नागपूर: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. नागपूरमध्ये तर मेडिकल कॉलेजलाच कोरोनाने विळखा घातला आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमधील 30 डॉक्टर्स, तीन नर्ससह एकूण 38 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (30 Doctors, 3 Nurses Among 38 Infected With Coronavirus In nagpur)

नागपूर मेडिकल कॉलेजमधील कोरोना बाधितांचा आकडा 38 झाला आहे. त्यात डेंटल महाविद्यालयातील 9, एमबीबीएसच्या 12, पीजी करणाऱ्या 9 आणि तीन स्टाफ नर्सचा समावेश आहे. त्यापैकी चार जणांना गृह विलगिकरनात ठेवण्यात आलं आहे. तर बाकी सगळ्यांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकजण हे लक्षण नसलेले आहेत. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सुद्धा भरती करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉलेज सुरू झालं. त्यात वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी आले होते. त्यामुळे या ठिकाणी येऊन त्यांना संक्रमण झालं. आता खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्टेल सॅनिटाइझ करण्यात आलं आहे, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी दिली.

नगरमध्ये एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोना

एकाच घरातल्या दहा जणांना कोरोना झाल्याच समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील दहा जणांना कोरोनाची लागण झालीय. कुटूंबातील एक तरुण पुणे येथे काही दिवस गेला. पुण्याहून घरी आल्यावर त्यास ताप आल्यानंतर तपासणी केली असता ‌कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर कुटूंबातील इतरांची तपासणी केल्यानंतर तरुणासह एकुण 10 जणांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

पुन्हा लॉकडाऊन

महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. राज्यात रविवारी आणि सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये भलतीच वाढ झाली. रविवारी जवळपास साडे तीन हजार कोरोना रुग्ण आणि सोमवारी 3 हजार 365 नवे रुग्ण मिळाले. पाठीमागच्या दोन आठवड्यांत जवळपास 21 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग जडला आहे. यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप व्हायला सुरुवात झाली आहे, याचा अंदाज येतो. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे. जर कोरोनाचा असाच प्रकोप कायम राहिला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का? लॉकडाऊन केलं तर कोणत्या भागांत केलं जाईल? त्याची रुपरेशा काय असेल? असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत.

‘या’ ठिकाणी लॉकडाऊन होणार?

संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागेल, याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु सीमित लॉकडाऊन केला जाऊ शकतो. ठराविक भागांमध्ये लॉकडाऊन करायचं झाल्यास ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा शहरांमध्ये कोरोनाच्या अधिक केसेस आहेत तिथे लॉकडाऊन होऊ शकतं. जसं की पुणे, नाशिक, अमरावती, वर्धा, मुंबई…. असंही होऊ शकतं की संपूर्ण जिल्ह्यात किंवा शहरात लॉकडाऊन लावण्याऐवजी फक्त जिथे कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, तिथेच लॉकडाऊन केलं जाऊ शकतं. (30 Doctors, 3 Nurses Among 38 Infected With Coronavirus In nagpur)

संबंधित बातम्या:

कोरोना संसर्ग वाढला, पुण्यात खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड्स आरक्षित, अकोला जिल्ह्यात संचारबंदी

महाराष्ट्रावर पुन्हा लॉकडाऊनचं संकट? लागलं तर कुठे कुठे लागणार? नव्या उद्रेकानं सरकारची चिंता वाढली, वाचा सविस्तर

धक्कादायक, अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना, परिरसरात खळबळ

(30 Doctors, 3 Nurses Among 38 Infected With Coronavirus In nagpur)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.